Bank Of Baroda : बँक ऑफ बडौदाचे नवे व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत; सर्व अपडेट एका क्लिकवर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक ऑफ बडौदाने ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवरील व्याज दरात वाढ करण्यात आली आहे.

Bank Of Baroda : बँक ऑफ बडौदाचे नवे व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत; सर्व अपडेट एका क्लिकवर
बँक ऑफ बडोदाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 8:36 PM

नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक ऑफ बडौदाने (Bank of Baroda) ठेवींवरील व्याजदरात (FD Interest Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवरील व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन नियम 22 मार्च पासून लागू करण्यात येणार आहे. बँक ऑफ बडौदाच्या ठेवींवर आता 2.80 टक्के ते 5.55 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकेल. एफडीचा मॅच्युरिटी कालावधी 7 दिवस ते 10 वर्ष यादरम्यान असेल. नवीन नियमानुसार, आता 7 दिवस ते 45 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 2.80 टक्के व्याज दिले जाईल. 46 दिवस ते 180 दिवसांपर्यंतच्या एफडीवर (FD Rates) 3.70 टक्के व्याजदर असेल. बँक ऑफ बडौदा ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या पेक्षा अधिक व्याज दर देत आहे.

नवा नियम, नवा व्याजदर

बँक ऑफ बडौदाच्या नवीन व्याज दरांनुसार आता ग्राहकांना 181 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 4.30 टक्के व्याज मिळेल. 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी एफडी वर 4.4 टक्के व्याज मिळेल. 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंतच्या एफडीवर 5.1 टक्के व्याज दिले जात आहे. बँक ऑफ बडौदा 3 वर्षाहून अधिक आणि 10 वर्षा पर्यंतच्या एफडीवर 5.35 टक्के व्याज अदा करत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल दर

बँक ऑफ बडौदा ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या पेक्षा अधिक व्याज दर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना डोमेस्टिक टर्म डिपॉझिटवर अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जात आहे. 2 कोटी पेक्षा कमी रकमेच्या सर्व एफडीवर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे. 5 ते 10 वर्षाच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.35 टक्के व्याज दिले जात आहे. नियमित दरापेक्षा एका टक्क्यांहून अधिक आहे.

बँक ऑफ बडौदाचे नवे व्याजदर

• 7 ते 14 दिवस – 2.80 टक्के • 15 ते 45 दिवस- 2.80 टक्के • 46 ते 90 दिवस – 3.70 टक्के • 91 ते 180 दिवस- 3.70 टक्के • 1 वर्ष – 5.00 टक्के

बचत खात्याचे व्याजदर

बँक ऑफ बडौदाच्या बचत खात्यातील 1 लाख रुपयांच्या रकमेवर 2.75 टक्के, 1 लाख रुपयांहून अधिक आणि 100 कोटींपेक्षा कमी रकमेवर 2.75 टक्के, 100 कोटी हून अधिक आणि 200 कोटींपेक्षा कमी वर 2.85 टक्के व्याज दर दिला जाईल.

इतर बातम्या : 

RUCHI SOYA : गुंतवणुकदारांनो दाखवा ‘रुची’; कर्ज फेडीसाठी बाबा रामदेवांचा ‘एफपीओ’!

संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नफा कमावण्याची संधी, एचडीएफसी लवकरच आणणार देशातील पहिला डिफेन्स फंड

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.