विधानसभेच्या निकालापूर्वीच विजयी मिरवणूक, राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गुन्हा

| Updated on: Oct 23, 2019 | 9:46 AM

विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला (FIR register on Sanjay Kadam) आहे.

विधानसभेच्या निकालापूर्वीच विजयी मिरवणूक, राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गुन्हा
Follow us on

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला (FIR register on Sanjay Kadam) आहे. संजय कदम हे खेड दापोलीचे उमेदवार आहेत. संजय कदम यांच्यासह पत्नी सायली कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला (FIR register on Sanjay Kadam) आहे.

विधानसभेचे मतदान पार पडल्यानंतर संजय कदम यांचे काही समर्थक खेड येथे जमा झाला. त्यानंतर त्यांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना समज दिली.

मात्र तरीही ही मिरवणूक बंद न करता ती सुरु होती. यामुळे संजय कदम यांच्यावर पोलीस चांगलेच संतापले. त्यांनी ताबडतोब ही मिरवणूक रद्द करायला लावली. मात्र त्या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर संजय कदम यांनी ही मिरवणूक पुन्हा सुरु (FIR register on Sanjay Kadam) केली.

दरम्यान निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम 143, 147, 149, 268, 290 अंतर्गत संजय कदम यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कदम यांच्यासह त्यांची पत्नी सायली कदम यांच्यावरही खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.