मोदी जे मशरूम खातात त्यांची किंमत वाचून बसेल धक्का, असं या मशरुममध्ये काय आहे खास?

मोदी त्यांच्या खान-पानसाठी नेहमीच प्रसिद्ध असतात. अनेकदा त्यांच्या आहाराबद्दल त्यांच्या फिटनेसबद्दल बोललं जातं. पण मोदींच्या सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे मशरूम. तेही हिमाचल प्रदेशातील. त्या मशरूमची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. त्या मशरूममध्ये अशी काय खासियत आहे जाणून घेऊयात.  

मोदी जे मशरूम खातात त्यांची किंमत वाचून बसेल धक्का, असं या मशरुममध्ये काय आहे खास?
Modi's favorite mushroom is 'Guchchi' mushroom
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2025 | 1:53 PM

मोदी त्यांच्या खान-पानसाठी नेहमीच प्रसिद्ध असतात. ते त्यांचा आहार कसा असतो? याबद्दल नेहमी चर्चा झालेली पाहायला मिळाली आहे. त्यांच्या आहारीतील एक पदार्थ ज्याची चर्चा बरीच झाली आहे आणि हा पदार्थ त्यांचा देखील तेवढाच आवडता आहे. तो म्हणजे मशरूम. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी एकदा काही पत्रकारांना सांगितले होते की त्यांच्या आरोग्याचे रहस्य हिमाचल प्रदेशातील मशरूम आहे. आणि ते फार महाग देखील आहे. त्या मशरूममध्ये असं काय खास आहे? ते जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त आवडणाऱ्या मशरूमची प्रजाती कोणती?

पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त आवडणाऱ्या मशरूमची प्रजाती ‘गुच्‍छी’ आहे आणि ती हिमालयीन पर्वतांमध्ये आढळते. या मशरुमची खासियत म्हणजे त्यांची लागवड करता येत नाही तर ते नैसर्गिकरित्या येतात. हे मशरूम उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या उंच पर्वतांमधील जंगलात आढळते आणि ते फक्त बर्फाच्या वाढीच्या आणि वितळण्याच्या दरम्यानच्या काळात वाढते.

मशरूमची किंमत जाणून धक्का बसेल 

हे मशरूम इतके दुर्मिळ असल्याने, त्याची किंमत देखील तेवढीच महागडी आहे. त्याची किंमत ही 30,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एक किलोमध्ये तसे भरपूर मशरूम असतात. तसेच हे मशरूम वाळवून विकले जातात.सरासरी, ‘गुच्‍छी’ मशरूम प्रति किलो 10 हजारला विकला जातो. तथापि, जर डोंगराळ भागात राहणारे कोणी तुमचे ओळखीचे असतील तर मात्र नक्कीच ते मशरूम तुम्हाला या किमतीपेक्षा स्वस्त मिळू शकतात.

पंतप्रधान मोदींना हे मशरूम खूप आवडतात 

पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून बरीच वर्षे घालवली, त्यामुळे त्या भागात त्यांचे अनेक मित्र आहेत. त्यांना मशरूमची ओढ होती कारण पर्वतांमध्ये शाकाहारी लोकांना उच्च प्रथिने आणि उबदार आहाराची आवश्यकता असते. तिथे हेच मशरूम जास्त प्रमाणात खाल्लेही जातात.पंतप्रधान दररोज ते खात नसले तरी, त्यांना ‘गुच्‍छी’ मशरूम खूप आवडते हे त्यांनी स्वत: देखील कबूल केले आहे. मोदी त्यांच्या पाहुण्यांसाठी देखील आवर्जून मशरूम मागवतात.

या मशरूमची खासियत काय आहे? 

या मशरूमची खासियत म्हणजे त्यात बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन डी आणि काही आवश्यक अमीनो आम्ल असतात. या मशरूमचे नियमितपणे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. केवळ भारतातच नाही तर युरोप, अमेरिका, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्येही या प्रजातीच्या मशरूमला खूप मागणी आहे. आणि म्हणून त्याची मागणी आता चक्क 30 पर्यंत विकले जात असल्याचं म्हटलं जातं.