Ekanath Shinde Exclusive : 40 पेक्षा अधिक आमदार एकत्र, दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार नाही, एकनाथ शिंदेंची ‘TV9 मराठी’ला माहिती

| Updated on: Jun 22, 2022 | 1:32 PM

एकनाथ शिंदे यांनी 'TV9 मराठी'ला मोठी माहिती दिली आहे.

Ekanath Shinde Exclusive : 40 पेक्षा अधिक आमदार एकत्र, दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार नाही, एकनाथ शिंदेंची TV9 मराठीला माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Image Credit source: social
Follow us on

मुंबई :  एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी ‘TV9 मराठी’ला Exclusive माहिती दिली आहे. यावेळी शिंदे म्हणाले की, ‘बाळासाहेबांच्या विचाराचे सगळे आमदार (MLA) आम्ही एकत्र आलो आहोत. आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे. कुणावरही व्यक्तिगत टीका करायची नाही. आम्ही ती करणार नाही. कट्टर शिवसैनिक होतो, आहे आणि राहणार आहे. आनंद दिघे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांना बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार दिले. तेच आम्हाला पुढे मिळाले. आमची भूमिका सुरुवातीपासून हिंदुत्वाची (Hindutva) होती. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची तडजोड आम्ही करणार नाही. माझ्यासोबत कुणीही जोरजबरदस्तीनं आलेले नाही. जवळपास 40 पेक्षा जास्तीचे आमदार आज सोबत आहेत. काल एक फोटो आणि व्हिडीओदेखील आलेला आहे,’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी ‘TV9 मराठी’ला Exclusive दिली आहे.

माझ्याकडे 40 आमदार :

आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येतील. राज्यपालांची भेट घेतली, असंही सांगितलं जातं आहे. एका विशेष विमानाने एकनाथ शिंदे हे मुंबईला येणार असल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

ठाकरे सरकारचे अखेरचे काही तास?

एकनाथ शिंदे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या पाठिंब्याने सुरु असलेली ही रणनिती यशस्वी झाली तर ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय, असं म्हणावं लागेल.

रात्रीतून काय घडलं?

कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या रात्रीतून गुवाहटीत दाखल झाले आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा उगारलेले हे सर्वजण शिवसेनेच्या रेंजमधूनच बाहेर गेल्यात जमा आहेत. आता गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे.