AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekanath Shinde : दादा म्हणतात भाजपचा संबंध नाही, मोहित कंबोजांची शिवसेनेच्या बंडखोरांसोबत धावपळ, कशासाठी?

भाजप नेते मोहित कंबोज बंडखोर शिवसेनेच्या आमदारांसोबत धावपळ का करत होते, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

Ekanath Shinde : दादा म्हणतात भाजपचा संबंध नाही, मोहित कंबोजांची शिवसेनेच्या बंडखोरांसोबत धावपळ, कशासाठी?
मोहित कंबोज बंडखोरांसोबतImage Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jun 22, 2022 | 8:25 AM
Share

गुवाहाटी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) गटासंदर्भात बोलताना भाजपचा (BJP) काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) बंडखोर शिवसेनेच्या आमदारांसोबत धावपळ का करत होते, त्यांच्यासोबत आमदार संजय़ कुटे का आहेत? या प्रश्नांची उत्तर मात्र भाजपानं दिलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा भाजपवर संशयाचं वातावरण निर्माण झालंय. तर दुसरीकडे हा भाजप-शिवसेना युतीचा तर डाव नाही ना, बंडखोर शिवसेना आमदार भाजपसोबत तर जाणार नाही ना, असे प्रश्न देखील सध्या चर्चेत आहे. दुसरीकडे माध्यमांशी बोलताना काही आमदारांनी जय महाराष्ट्र देखील म्हटलंय. याचा अर्थ हा शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र तर नव्हता ना, अशाही प्रश्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पाहा मोहित कंबोज यांची बंडखोरांसोबत धावपळ

शिवसेना -भाजपचे  30 वर्षांपासून संबंध

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार ‘टीव्ही9 मराठी’सोबत बोलताना सांगितलं की शिवसेना आणि भाजपचे मागच्या तीस वर्षांपासून संबंध आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात मदत केली जाते. मात्र, सध्या तरी शिवसेना आणि भाजप युतीचा काहीही संबंध नाही, असं मुनगंटीवार म्हणालेतय.

चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आपल्या बंडावर कायम आहेत. त्यामुळे आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बळ देणारी विधाने भाजपमधून केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा युतीचा प्रस्ताव आला तर त्याचा विचार करू, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. पाटील हे शिंदे यांच्या बंडाला बळ देत असल्याचं या विधानातून ध्वनीत होत आहे. तसेच शिंदे यांना युतीचा प्रस्ताव पाठवा असं तर पाटील यांना शिंदे यांना सूचवायचं नाही ना? असाही सवाल यावेळी केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हे विधान केलं आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार