काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल राजू शेट्टींकडून जाहीर नाराजी

लातूर : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत इतर छोट्या पक्षांची आघाडी होणे कठीण दिसते आहे. कारण छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं दातृत्व काँग्रेस-राष्ट्रवादीत दिसत नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या गातेगाव येथे बोलताना त्यांनी जाहीरपणे आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली. गातेगाव येथे दुष्काळ परिषदेचं आयोजन करण्यात आलं होते. या निमित्ताने …

काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल राजू शेट्टींकडून जाहीर नाराजी

लातूर : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत इतर छोट्या पक्षांची आघाडी होणे कठीण दिसते आहे. कारण छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं दातृत्व काँग्रेस-राष्ट्रवादीत दिसत नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या गातेगाव येथे बोलताना त्यांनी जाहीरपणे आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली.

गातेगाव येथे दुष्काळ परिषदेचं आयोजन करण्यात आलं होते. या निमित्ताने झालेल्या सभेनंतर खासदार राजू शेट्टी माध्यमांशी बोलत होते.

“भाजपाला पराभूत करण्याची सर्वांची इच्छा आहे. मात्र मोठे पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने छोट्या-छोट्या पक्षांचाही विचार करायला हवा. मात्र असं होताना दिसत नाही. भाजपला पराभूत करायचे असेल तर छोट्या पक्षांची त्यांना मदत लागेल आणि आमच्यासारख्या छोट्या पक्षांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी या मोठ्या पक्षांची आहे. तरच आघाडी अस्तित्वात येईल. मात्र हे दातृत्व या मोठ्या पक्षात दिसत नाही.”, असे म्हणत खासदार राजू शेट्टींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत खासदार राजू शेट्टीही सामील होण्याची चिन्ह दिसत असताना, राजू शेट्टींनी केलेलं हे वक्तव्य या चर्चांना तडा देणारं आहे. त्यामुळे आघाडीत छोट्या पक्षांना स्थान असेल का, यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरु झाले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *