
“पुलवामानंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये झाला आहे. पुलवामामध्ये 40 जवान मारले गेले. ती सुरक्षेत चूक होती. ते रहस्य आहे, त्यामागे कोण होतं, ते शेवटपर्यंत समजलं नाही. पुलावामाचा राजकीय फायदा मोदी सरकारने घेतला. काल पर्यटक मारले गेले. महाराष्ट्रातील सहा लोक आहेत. 370 कलम हटवलं. त्यानंतर जम्म-काश्मीर केंद्र शासित केलं. म्हणजे केंद्राच पूर्ण नियंत्रण रहावं. जे काल झालं, त्याची सगळी जबाबदारी केंद्र सरकारची आहे. का झाली ही घटना? गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “हा टूरिस्ट सीजन आहे, दोन ते तीन हजार पर्यटक होते. एकही पोलीस तिथे नव्हता. श्रीनगरला अमित शाह उतरले. त्यांच्या सुरक्षेसाछी जवळपास 75 कारचा ताफा होता. 500 पेक्षा जास्त पोलीस होते. बॉम्बस्कॉड होतं. मात्र सामान्य व्यक्तीसाठी, जनतेसाठी कोणी नाही” असं संजय राऊत म्हणाले.
“सैन्यात 2 लाख पदं रिक्त आहेत. डिफेन्स बजेटमध्ये कपात केली जातेय. लाडकी बहिण सारख्या योजनेला पैसा वळवला जातो. सुरक्षा व्यवस्थेशी खेळतात. नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असं सांगितलं जात होतं, पण उलट दहशतवाद वाढतोय. संसदेत खोटं सांगितलं जातं. या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह जबाबदार आहेत” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
‘अमित शाह फेल, अपशकुनी’
“देशात द्वेष पसरवण्याच काम सुरु आहे. त्याचा हा परिणाम आहे. हे लोक मोठमोठ्या गोष्टी बोलतात. हे खोकले आहेत. 56 इंचाची छाती कुठे गेली. आक्रोश पाहा. नवीन लग्न झालेलं. तिच्यासमोर पतीची हत्या झाली. कोण जबाबदार? अमित शाह सारखे लोक 24 तास सरकार बनवण्यात, सरकार पाडण्यात व्यस्त असतात, तर हे लोक जनतेशी सुरक्षा कशी करणार?. अमित शाह फेल होम मिनिस्ट आहेत. सगळा देश त्यांचा राजीनामा मागतोय. अमित शाह फेल आहेत. अमित शाह पेहेलगामला गेले काही मेहेरबानी केली नाही. 27 लोकांच्या मृत्यूला ते जबाबदार आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.