AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेतही ऑपरेशन टायगर? 20 नगरसेवक फुटणार; ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होणार

ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेत एकूण 65 नगरसेवक आहेत. आता यापैकी 20 नगरसेवक फुटणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे.

मुंबई महापालिकेतही ऑपरेशन टायगर? 20 नगरसेवक फुटणार; ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होणार
BMCImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 18, 2026 | 12:30 PM
Share

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. असे सुरु असतानाच आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाचे नगरसेवक किरण लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील २० पेक्षा जास्त नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किरण लांडगे नेमकं काय म्हणाले?

किरण लांडगे यांनी स्पष्ट केले की, “ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत.” त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या २० हून अधिक नगरसेवक शिंदे गटाकडे वळण्याच्या विचारात आहेत. मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाकडे एकूण ६५ नगरसेवक आहेत. या संख्येमध्ये मोठी फूट पडल्यास ठाकरे गटाची ताकद लक्षणीयरीत्या कमी होईल.

राजकीय हालचालींना वेग

राजकीय वर्तुळात या हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे गट ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सक्रिय प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत आणि किरण लांडगे यांच्या विधानाने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

संपूर्ण मुंबईच्या राजकारणावर होणार परिणाम

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असल्याने येथील राजकीय समीकरणे बदलल्यास फक्त शिवसेनेच्या दोन्ही गटांवरच नव्हे तर संपूर्ण मुंबईच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या महापालिकेत सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांमध्ये ही फूट निर्णायक ठरू शकते.

शिवसेनेत २०२२ च्या गटबाजीपासून दोन्ही गटांमध्ये सतत आमदार, खासदार आणि स्थानिक नेत्यांच्या फुटीचे प्रयत्न सुरू आहेत. ६५ नगरसेवकांपैकी २० पेक्षा जास्त नगरसेवक गेल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण आता 9 पैकी 6 खासदार देखील शिंदे गटात प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता