BMC Election 2022 Asra Colony S. V. Road ((Ward 16) : आघाडी झाल्यास भाजपला वॉर्ड राखणं अशक्य; वाचा, वॉर्ड क्रमांक 16चे वारे कुठल्या दिशेने?

| Updated on: Aug 20, 2022 | 11:53 AM

BMC Election 2022 Asra Colony S. V. Road ((Ward 16) : मागच्या निवडणुकीत खेडेकर यांना शिवसेनेच्या प्रिती दांडेकर यांनी चांगलीच टफ दिली होती. मात्र, थोडक्यात त्यांचा विजय हुकला.

BMC Election 2022 Asra Colony S. V. Road ((Ward 16) : आघाडी झाल्यास भाजपला वॉर्ड राखणं अशक्य; वाचा, वॉर्ड क्रमांक 16चे वारे कुठल्या दिशेने?
आघाडी झाल्यास भाजपला वॉर्ड राखणं अशक्य; वाचा, वॉर्ड क्रमांक 16चे वारे कुठल्या दिशेने?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: 2017मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत (BMC Election 2022) सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामुळे सर्वच वार्डांमध्ये पंचरंगी निवडणुका झाल्या होत्या. शिवसेना (shivsena), भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (congress) या सर्वांनीच निवडणुकीत उमेदवार देऊन आक्रमक प्रचारही केला होता. त्यात भाजप आणि शिवसेनेनेच सर्वाधिक जागा निवडून आणल्या. वॉर्ड क्रमांक 16 मधील निवडणूकही अत्यंत अटीतटीची होईल असं वाटत होतं. पण भाजपच्या उमेदवार अंजली खेडकर यांनी दणदणीत विजय मिळविला होता. त्यांनी तब्बल दोन, अडीच हजाराचं मताधिक्य घेतलं होतं. परंतु या महापालिका निवडणुकीत परिस्थिती थोडी वेगळी आहे. या वेळी खेडकर यांना जिंकलेला वॉर्ड राखण्यासाठीच अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. खेडकर हा वॉर्ड राखतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जिंकण सोपं, वॉर्ड राखणं कठिण

2017मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर होते. त्यामुळे अंजली खेडकर यांचा विजय झाला. 1911 मताधिक्य घेऊन त्या विजयी झाल्या होत्या. यावेळी परिस्थिती थोडी वेगळी असणार आहे. यावेळी महाविकास आघाडीची झाल्यास खेडेकर यांचा विजय होणं कठिण असल्याचं आकडे सांगतात. काँग्रेसने शिवसेनेसोबत युती नाही केली. अन् फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीचीच युती झाली तरी खेडेकर यांना विजयासाठी झगडावं लागणार असल्याचं दिसतंय.

आकडे काय सांगतात?

मागच्यावेळी अंजली खेडेकर यांना 9465, राष्ट्रवादीच्या मनिषा नवनाथे यांना 1852, शिवसेनेच्या प्रिती दांडेकर यांना 7554, बसपाच्या पूनम नितेश इजगज यांना 632, मनसेच्या रेश्मा निवळे यांना 1724 आणि काँग्रेसच्या विजयालक्ष्मी शेट्टी यांना 6676 मते मिळाली होती. तर नोटाला 515 मते मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक 16 : BMC Election 2022 Ward 16

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर/ अपक्ष

दिग्गजांना पराभूत केलं

मागच्या निवडणुकीत खेडेकर यांना शिवसेनेच्या प्रिती दांडेकर यांनी चांगलीच टफ दिली होती. मात्र, थोडक्यात त्यांचा विजय हुकला. तर काँग्रेसच्या विजयालक्ष्मी शेट्टी यांनीही चांगली मते घेतली होती. त्यामुळे खेडेकर विजयाची पुनरावृत्ती करतात की शिवसेना विजयश्री खेचून आणते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

1911 मतांनी विजयी

>> अंजली खेडेकर (भाजप)- 9465
>> रेश्मा निवळे (मनसे-) 1724
>> प्रिती दांडेकर (शिवसेना)- 7554
>> विजयालक्ष्मी शेट्टी (काँग्रेस)- 6676
>> पूनम नितेश इजगज (बसपा) – 632
>> मनिषा नवनाथे (राष्ट्रवादी)- 1852
>> नोटा- 515
>> खेडेकर यांचं मताधिक्य- 1911

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

या वॉर्डात असरा कॉलनी, जया नगर, सुमेर नगर, असरा कॉलनी, एस.व्ही रोड आदी भागांचा समावेश आहे.

मतदारसंघातील टक्का किती?

वॉर्ड क्रमांक 16ची एकूण लोकसंख्या 49 हजार दोन आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 339 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 417 आहे.

वॉर्ड आरक्षित की खुला?

2022च्या पालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत हा वॉर्ड खुल्या राहिला आहे. त्यामुळे या वॉर्डातून पुरुषही उभे राहू शकणार आहेत. त्यामुळे भाजप खेडेकर यांना रिपीट करतात की अन्य कुणाला तिकीट देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.