AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Ward G South 198 : शिवसेनेच्या निर्विवाद वर्चस्वाचा दक्षिण मुंबईतला वॉर्ड 198! यावेळी टक्कर मनसे की इतर कोणी?

प्रमुख पक्षांसह दोन अपक्ष निवडणूक रिंगणात होते. शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक तेरा हजारांवर तर सर्वात कमी मते अपक्षाला सव्वाशेवर मिळालेली पाहायला मिळाली. आता यावेळी बाजी कोण मारणार, शिवसेना की मनसे की आणखी तिसरा कोणी, याची उत्सुकता आहे.

BMC Election 2022 Ward G South 198 : शिवसेनेच्या निर्विवाद वर्चस्वाचा दक्षिण मुंबईतला वॉर्ड 198! यावेळी टक्कर मनसे की इतर कोणी?
मुंबई महापालिका, वॉर्ड 198Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 10, 2022 | 5:15 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणूक रणधुमाळीत वॉर्ड क्रमांक 198चा आढावा घेऊ या. या वॉर्डात मागील वेळी म्हणजेच 2017च्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले ते शिवसेनेने. तर मनसेने शिवसेनेला (MNS-Shivsena) टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेच्या उमेदवाराचा याठिकाणी पराभव झालेला पाहायला मिळाला. दक्षिण मुंबईतील (South Mumbai) हा एक महत्त्वाचा प्रभाग असून याठिकाणी मफतलाल मील त्याचप्रमाणे सन मील आदी परिसर येतात. जवळपास सहा उमेदवारांनी याठिकाणी आपले नशीब आजमावले होते. प्रमुख पक्षांसह दोन अपक्ष निवडणूक रिंगणात होते. शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक तेरा हजारांवर तर सर्वात कमी मते अपक्षाला सव्वाशेवर मिळालेली पाहायला मिळाली. आता यावेळी बाजी कोण मारणार, शिवसेना की मनसे की आणखी तिसरा कोणी, याची उत्सुकता आहे.

उमेदवार आणि मते (2017)

स्नेहल सूर्यकांत आंबेकर (शिवसेना) – 13,614

कुणाल रमेश कदम (रिपाइं) – 1720

संजय शंकर कांबळे (काँग्रेस) – 1598

विनायक (बंटी) म्हशीलकर (मनसे) – 8088

रामचंद्र सिताराम नारकर (अपक्ष) – 123

मकरंद श्रीधर तासगांवकर (अपक्ष) – 964

आकडेवारी काय सांगते?

शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांचा याठिकाणी विजय झाला होता. 13 हजारांवर मते त्यांनी मिळवली होती. या वॉर्डात एकूण 49,547 मतदार असून 26,326 वैध मते प्राप्त झाली. एक मत अवैध म्हणून गणले गेले. तर नोटाला 964 मते मिळाली होती. अपक्षांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा नोटाला मिळालेली मते अधिक होती. म्हणजेच याठिकाणच्या नागरिकांनी अपक्षांना पूर्णपणे नाकारल्याचे पाहयला मिळाले. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी दोघांवर गुन्हेगारी स्वरुपाच्या केसेस असल्याचे नमूद आहे.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

सन मील लेन, मफतलाल मील, लोअर परेल (पश्चिम), वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप, धुरू वाडी, गांधी नगर, एनएम जोशी पोलीस स्टेशन

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल