BMC Election 2022 Sewri West (ward -202) : सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या शिवडी पश्चिममध्ये नेमक कोण बाजी मारणार?

| Updated on: Jun 20, 2022 | 8:00 AM

या सर्वसाधारण महिला आरक्षण वॉर्डामध्ये नेमकी लढत कशी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांनी 12हजार 32 मिळवत आपला विजय निश्चित केला होता.

BMC Election 2022 Sewri West (ward -202) : सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या शिवडी पश्चिममध्ये नेमक  कोण बाजी मारणार?
BMC Ward 202
Follow us on

मुंबई– महानगरपालिकेचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. नुकतीच राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आरक्षणाची सोडत केली. त्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारी मिळवण्याचा तयारीला लागलेले आहेत. वार्ड क्रमांक 202 शिवडी पश्चिम (Sewri West)म्हणून वार्ड ओळखला जातोय.  या सर्वसाधारण महिला आरक्षण वॉर्डामध्ये नेमकी लढत कशी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांनी 12हजार 32 मिळवत आपला विजय निश्चित केला होता. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) प्रणाली बामणे 4 हजार 386 मतांनी दुसऱ्या स्थानावर होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या यांनी 4हजार 329 मते मिळत तिसरे स्थान पटकावले होते. या तीन पक्षांबरोबरच नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष , भारतीय जनता पार्टी, भारिप बहुजन महासंघ या पक्षाने निवडणूक लढविली होती.

2017 मध्ये निवडणुकीतील उमेदवार

प्रणाली बामणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 4386 ,

बावकर रिया – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 4329,

हे सुद्धा वाचा

भास्करनं उमा – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- 986,

जाधव श्रद्धा- शिवसेना – 12032,

वंदना माने – भारतीय कम्युनिस्ट पक्ष- 413 ,

परब मानसी-अपक्ष – 855,

विजयालक्ष्मी पवार – भारतीय जनता पार्टी – 2292

मानसी सपकाळ – भरीप बहुजन महासंघ – 454

मतदार संघाची लोकसंख्या किती?

मतदार संघाची लोकसंख्या 49 हजार 531असून यामध्ये 32 हजार541 अनुसूचित जातीचे 242 अनुसूचित जमातीचे नागरिक आहेत 2017 च्या निवडणुकीत एकूण 27 हजार 294 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता

वार्ड कुठून कुठपर्यंत

या वार्डात परमानंद वाडी शिवाजी नगर शिवडी पश्चिम या परिसराचा समावेश होतो