AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: सेलिब्रिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार? संजय राऊत यांचा भागवतांना सवाल

Sanjay Raut on RSS Chief Mohan Bhagwat: सलमान खान हा वरळी डोम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिला आणि राजकारणाला फोडणी मिळाली. उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावरून अचूक निशाणा साधला. हा स्टंट गर्दी जमावण्यासाठी केला की मुस्लिमानांही यापुढे संघात प्रवेश मिळणार असा रोकडा सवाल केला.

Sanjay Raut: सेलिब्रिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार? संजय राऊत यांचा भागवतांना सवाल
संजय राऊत, मोहन भागवत, सलमान खान Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 10:49 AM
Share

Sanjay Raut on RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव सुरू आहे. काल मुंबईतील वरळी डोम इथं संघाने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी झाडून हजेरी लावली. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान जातीने या कार्यक्रमाला हजर होता. त्यावरून राजकीय फोडणी बसली. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सलमान खानच्या हजेरीवरून संघाला चिमटा काढला. सलमान खानला सेलिब्रिटी म्हणून बोलावले की आता मुस्लिमानांही संघात प्रवेश मिळणार? असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला. त्यावरून आता राजकारण तापण्याचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिल्लीत सरत्या वर्षात बौद्धिक खुराक संघाने वाटला. त्यानंतर संघाचे कार्यक्रम बंगळुरू इथं सुद्धा झाले. शताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम संघाकडून करण्यात येत आहे. पण बदलत्या समाज मनाची नस पकडण्यासाठी संघाने अभिनव प्रयोग केला. वरळी डोम इथं बॉलिवूडसह फॅशन जगतातील आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी आणि सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. स्वत: सरसंघचालकांनी सलमानचा उल्लेख करत तो फॅशन आयकॉन असल्याचे सांगितले.

संजय राऊतांचा अचूक निशाणा?

“काल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा एक कार्यक्रम झाला. मी पाहत होतो. मला ही आमंत्रण होतं. पण एक दुसरा कार्यक्रम असल्याने मला जाता आलं नाही. नाहीतर मी ही संघाच्या कार्यक्रमाला गेलो असतो. सलमान खान व्यासपीठावर होते असं मला कळालं. हे सलमान खान याचं स्वागत होतं गर्दी जमावण्यासाठी की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे. सलमान खान या नटाला आमंत्रण होतं, व्यासपीठावर की संघात, संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्याचं स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं, कारण ज्या पद्धतीनं हिंदू-मुसलमान असा द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही दिवसात करण्यात आला. त्यात संघ ही सामील आहे. मोदी, फडणवीस, अमित शाह वा इतर सर्व लोक हे द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत. मोदी हे संघाचेच नेते आहेत. त्यामुळे सलमान खान आणि इतर कलाकारांना तुम्ही व्यासपीठावर घेतलं. पण हे सलमान खान पुरतंच मर्यादीत आहे का? सध्या सत्ता आहे त्यामुळे हे लोक व्यासपीठावर आहेत. उद्या सत्ता गेल्यावर हे लोक तुमच्या व्यासपीठावर येतील का? हा फार गंमतीचा प्रश्न आहे, हा प्रकार माझ्या कानावरती आला. क्या करेंगे भाई, जाना पडता है.ठीक आहे. सलमान खान याला बोलावलं याचं स्वागत, पण या देशात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी मुसलमान आहेत. त्यांचंही स्वागत करा.” अशी खणखणीत प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार