AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलींच्या शोषणाची कहाणी, गडगंज श्रीमंत व्यक्तीचे काळे कारनामे समोर, OTT वर तुफान ट्रेंडमध्ये सीरिज

अल्पवयीन मुलींच्या शोषणाची मन सुन्न करणारी कहाणी, 'ती' वादग्रस्त फाईल, गडगंज श्रीमंत व्यक्तीचे काळे कारनामे समोर, OTT वर तुफान ट्रेंडमध्ये सीरिज... फाईलमुळे माजली आहे सर्वत्र खळबळ...

अल्पवयीन मुलींच्या शोषणाची कहाणी, गडगंज श्रीमंत व्यक्तीचे काळे कारनामे समोर, OTT वर तुफान ट्रेंडमध्ये सीरिज
jeffrey epstein
| Updated on: Feb 08, 2026 | 10:44 AM
Share

ओटीटी प्लॅटफॉर्म अशा अनेक सीरिज आहेत, ज्या सत्य घटनेवर आधारित आहेत. आता देखील अशी एक सीरिज ट्रेंडमध्ये आहे. सीरिज 2020 मध्ये प्रदर्शित झाली, पण आता ट्रेंड करत आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे… एका वादग्रस्त फाईलमुळे गडगंज व्यक्तीचे काळे कारणामे समोर आले आहेत, ज्यामुळे अनेक दिग्गज व्यक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Epstein) यांच्या काळ्या कृत्यांचे पुरावे एपस्टीन फाइल्स (What Is Epstein Files) समोर आल्यामुळे चर्चेत आहेत. 30 लाख पानांची फाईल… हजारो फोटो आणि व्हिडीओंसोबत जारी करण्यात आलेल्या एपस्टीन फाइल्स असं भयानक सत्य समोर आले ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

एपस्टाईन फाइल्सच्या आधीही एका वेब सिरीजद्वारे जेफ्रीच्या काळ्या कारनाम्यांची झलक जगाला दाखवण्यात आली होती. 6 वर्षांपूर्वी जेफ्रीच्या काळ्या कारनाम्यांची सीरिज समोर आली होती. पण तेव्हा सीरिज चर्चेत राहिली नाही. पण आता सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे.

जेफरी एपस्टीन फिल्थी रिच कहाणी

जेफ्रीच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित 4 एपिसोडच्या सीरिजचं नाव जेफरी एपस्टीन: फिल्थी रिच (Jeffrey Epstein Filty Rich) असं आहे. सीरिजचं दिग्दर्शन लिसा ब्रायंट यांनी केलं होतं. या माहितीपट सीरिजमध्ये, पीडितांच्या साक्षीद्वारे जेफ्रीच्या घृणास्पद कृत्यांचं उघडपणे सादरीकरण करण्यात आलं.

4 भागांची ही डॉक्युमेंटरी सीरिज पीडितांच्या साक्षीने सुरू होते, त्यानंतर गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यातून कसा सुटतो, प्रसिद्धी आणि संपत्ती कशी मिळवतो हे सीरिजमध्ये दाखवण्यात आलं असून जेफ्री बेटाची कहाणी सादर करते. 2010 मध्ये गुन्हेगारला पुन्हा कसं अटक करण्यात आली ते या सीरिजमध्ये एपस्टाईनच्या केसबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही सांगितलं आहे.

कुठे पाहता येईल जेफरी एपस्टीनची सीरिज

प्रत्येक एपिसोड अंदाजे एक तासाचा आहे. जर तुम्हाला जेफ्री एपस्टाईन प्रकरणाची सखोल माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही ही डॉक्युमेंटरी मालिका OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. ही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे आणि टॉप १० मध्ये नवव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.