‘पालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती’, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

| Updated on: Jun 04, 2021 | 8:30 PM

ग्लोबल टेंडर रद्द झाल्याबद्दल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय.

पालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमी लसीचा पुरवठा होण्यासाठी मुंबई महापालिकेनं ग्लोबल टेंडर काढलं. मात्र, या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक बसलाय. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘पालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती’, अशा शब्दात भातखळकर यांनी शिवसेनवर टीका केलीय. (Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena and Thackeray government)

‘पालिकेच्या ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला. पालिकेचे हे टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती. जगातले अनेक देश लसीसाठी कंपन्यांना आगाऊ रक्कम देत असताना पालिका जाणीवपूर्वक ही रक्कम न देण्याचा हट्ट धरून बसली.कारण एकच त्यांना पैसा टाकायचा नव्हता लसी घ्यायच्या नव्हत्या. फक्त नौटंकी करायची होती’, असा टोला भातखळकर यांनी लगावलाय.

कोरोना लसीकरणावरुन ठाकरे सरकारला टोला

भातखळकर यांनी ग्लोबल टेंडरवरुन शिवसेनेवर टीका करताना ठाकरे सरकारवरही हल्ला चढवलाय. केंद्राने 45+ वयोगटासाठी दिलेल्या लशीतून सेलिब्रेटी आणि जवळच्या लोकांची सोय करणाऱ्या ठाकरे सरकारला आणि त्यांची सत्ता असलेल्या पालिकेला ग्लोबल टेंडरची केवळ धूळफेक करायची होती. हे जनतेच्याही आता लक्षात आलंय, अशी टीकाही भातखळकर यांनी केलीय.

कोरोना लसीचं ग्लोबल टेंडर रद्द

कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. मात्र या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली होती. त्यामुळे नऊच कंपन्या या निविदा प्रक्रियेत होत्या. मात्र, लसींचा पुरवठा करण्यासाठीच्या अटी आणि शर्तीमध्ये या कंपन्या पात्र ठरल्या नाहीत. त्यामुळे अखेर ही ग्लोबल टेंडर प्रक्रिया रद्द झाली आहे. तसेच एकाही लस उत्पादक कंपनीने या निविदा प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. त्यामुळेही महापालिकेला लस पुरवठ्याच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारी कंपनी मिळू शकली नाही. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच लस मिळण्याची शक्यता मावळली असून आता केंद्र सरकारकडून येणाऱ्या लसींवरच पालिकेची सर्व भिस्त असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | एकही कंपनी पात्र ठरली नाही, अखेर मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर रद्द

‘स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरु, ग्लोबल टेंडर रद्द झालं तरी मुंबईला लस मिळणार

 Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena and Thackeray government