AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विठ्ठला, आम्हा साऱ्यांना सांभाळून घे…; भेटीवेळी छगन भुजबळ यांची शरद पवार यांना गळ

Ajit Pawar Group NCP Ministers Meet Sharad Pawar : अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या भेटीतील तीन मोठे मुद्दे; वाचा सविस्तर...

विठ्ठला, आम्हा साऱ्यांना सांभाळून घे...; भेटीवेळी छगन भुजबळ यांची शरद पवार यांना गळ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 16, 2023 | 5:07 PM
Share

मुंबई | 16 जुलै 2023 :  मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी अचानकपणे अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंत्री या ठिकाणी आले. शरद पवार यांची अचानकपणे भेट घेतली. या भेटीची राज्याच्या राजकारणात चर्चा होत आहे. या भेटीतील महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकूयात…

छगन भुजबळ यांचं वक्तव्य

मंत्री छगन भुजबळ हे जेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटरला पोहोचले तेव्हा त्यांनी शरद पवार यांना विनंती केली. विठ्ठला आम्हा साऱ्यांना सांभाळून घे…, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना गळ घातली.

बनसोडे, झिरवळ शरद पवारांच्या पाया पडले

यशवंतराव चव्हाण सेंटरवरील या भेटीत आणखी एक घटना घडली. मंत्री संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांच्या पाया पडले. याचीही राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

शरद पवारांना विनंती

अजित पवार गटांकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र शरद पवार यांनी या सगळ्याला प्रतिसाद दिला नसल्याची माहिती आहे. प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती आहे.

आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांची वेळ न मागता आम्ही आलो. पवारसाहेबांना भेटलो. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले आमच्या मनात पवार साहेबांबद्दल आदर आहे. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा यासाठी त्यांनी योग्य विचार करावा. आम्हाला मार्गदर्शन करावं, अशी विनंती त्यांना केली असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

शरद पवारांनी म्हणणं ऐकून घेतलं. मतं जाणून घेतली. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांनी जरी या सगळ्याला प्रतिसाद दिला नसला तरी येत्या काळात याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं असेल.

पंधरा दिवसात दोनदा भेट

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्यामुळे पवार कुटुंबात आणि एकूणच राष्ट्रवादीत फूट पडल्याचं बोललं जात होतं. मात्र दोन दिवसाआधीही प्रतिभा पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले होते. त्यावेळी आमचं कुटुंब एकत्रित आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. शिवाय आजही मुंबईत ही भेट झाली. जरी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा मार्ग निवडला असला तरी त्यांनी मागच्या पंधरा दिवसात दोनदा पवारांची भेट घेतली आहे.

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...