AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांच्यासारखंच शरद पवारांसोबतही तसंच घडणार; रोहित पवार यांनी व्हीडिओ शेअर करत केलं मोठं वक्तव्य

Rohit Pawar Tweet on Sharad Pawar : तुमच्यावर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता, एवढं सगळं दिलं... अजून काय पाहिजे?; रोहित पवार यांचा दिलीप वळसे पाटलांना थेट सवाल

राहुल गांधी यांच्यासारखंच शरद पवारांसोबतही तसंच घडणार; रोहित पवार यांनी व्हीडिओ शेअर करत केलं मोठं वक्तव्य
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 06, 2023 | 12:29 PM
Share

मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागला गेली आहे. तसंच पवार कुटुंबाचेही दोन भाग झालेत. अशात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार विरूद्ध अजित पवार अशी सध्याची स्थिती आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे रोज ट्विट करत अजित पवार गटावर निशाणा साधत आहेत.

आज रोहित पवार यांनी राहुल गांधी यांचा तेलंगणातील एक व्हीडिओ शेअर करत रोहित पवार यांनी शरद पवार यांना देखील असाच लोकांचा प्रतिसाद मिळेल असं म्हटलं आहे. शिवाय BRS पक्षावरही टीका केली आहे.

रोहित पवार यांचं ट्विट

लोकांनी निवडणूक हातात घेणं म्हणजे काय याची ही झलक आहे.. BRS पक्ष महाराष्ट्राकडे लक्ष देत असताना त्यांच्या स्वत:च्या तेलंगणा राज्यात मात्र लोकांनी राहुल जी गांधी यांना अक्षरशः डोक्यावर घेतलंय…. आणि लवकरच महाराष्ट्रात साहेबांच्याबाबतही असंच चित्र दिसेल…, असं रोहित पवार म्हणालेत.

तसंच राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही रोहित पवार यांनी प्रश्न विचारला आहे. वळसे पाटील यांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या पदांची यादीच रोहित पवार यांनी शेअर केली आहे. एवढं सगळं दिलं, अजून काय पाहिजे?, असं रोहित पवार म्हणालेत.

रोहित पवार यांचं ट्विट

मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती. असो! प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?

तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करली गुलामी?

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?