
नागपूर: नुकत्याच महापालिकेच्या निवडणूका (Nagpur MNC) जाहीर झालेल्या आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीसच नागपूरचे असल्याने नागपूरमध्ये भाजपला (BJP) असणारं महत्त्व कुणी नाकारू शकत नाही. नागपूर हा भाजपचाच किल्ला म्हटलं जातं. 2017च्या निवडणुकीत सुद्धा इथे भाजपनेच बाजी मारली होती. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पूर्वी 38 प्रभाग होते आता 52 आहेत. नागपूरचा वॉर्ड क्रमांक 9 याची लोकसंख्या एकूण 44588 आहे. वॉर्ड क्रमांक 9 हे अ, ब, क, ड यांमध्ये विभागलेलं आहे. वॉर्ड 9 अ मध्ये भाजपच आहे, भाजपचीच चलती आहे पण उरलेल्या ब, क, ड या विभागात बहुजन समाज पार्टीचं (BSP) 2017 ला वर्चस्व होतं. मतदार राजाने उरलेल्या या तीन विभागात बहुजन समाज पार्टीला पसंती दिली होती. आता यावर्षीच्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप निवडून येतंय की बहुजन समाज पार्टी हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
या प्रभागाची व्याप्ती एकता कॉलनी, टेकानाका बुध्दनगर टेका हबीबनगर, सिध्दार्थनगर, बाबा बुध्दनगर, महेंद्र नगर यादवनगर, आझादनगर (नवी बस्ती), कलाम बंदे नवाज नगर अशी आहे. प्रभागाच्या उत्तर भागात कामठी रोडवरील इंदौरा चौकापासून ईशान्य दिशेकडे जाणा-या कामठी रस्त्याने कामठी रोड वरील ऑटोमोटीव्ह चौकापर्यंतचा भाग आहे. पूर्व भाग कामठी रोडवरील ऑटोमोटीव्ह चौकापासुन आग्नेय दिशेकडे जाणा-या रिंगरोडने रिंगरोड वरील नॉर्थ कॅनलच्या पूलापर्यंत (यशोधरानगर पोलीस स्टेशन) या भागांनी व्यापलेला आहे. वॉर्ड क्रमांक 9 च्या दक्षिण भागात रिंगरोडवरील नॉर्थ कॅनलच्या पुलापासुन (यशोधरानगर पोलीस स्टेशन) पश्चिमेकडे जाणा-या नॉर्थ कॅनलच्या गुरुनानक द्वार व राजपुत रेस्टॉरेंट जवळील पाचपावली रस्त्यापर्यंतचा भाग आणि पश्चिम भागातील पाचपावली रस्त्यावरील राजपुत रेस्टॉरेंट पासुन उत्तरेकडे जाणा-या पाचपावली रस्त्याने कामठी रोडवरील इंदौरा चौकापर्यंतचा भाग समाविष्ट आहे.
| पक्ष | उमेदवार | विजयी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| अपक्ष / इतर |
| पक्ष | उमेदवार | विजयी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| अपक्ष / इतर |
| पक्ष | उमेदवार | विजयी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| अपक्ष / इतर |
2017 मध्ये वॉर्ड क्रमांक 9 अ मधून काँग्रेसकडून स्नेहा निकोसे, वॉर्ड क्रमांक 9 ब मधून संजय बुरेवार, वॉर्ड 9 क मधून ममता सहारे आणि वॉर्ड 9 ड नरेंद्र वालदे हे उमेदवार जिंकले होते. वॉर्ड 9 ब, क, ड या विभातून निवडून आलेले तीनही उमेदवार बहुजन समाज पार्टीचे होते.
प्रभागांची आरक्षणे यावर्षी बदलली आहेत. प्रभाग क्रमांक 9 अ ही जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. ब मध्ये सर्वसाधारण महिलांना आरक्षण आहे. त्याचबरोबर क मध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे.