मोठी बातमी! अखेर रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची नावं जाहीर, या नेत्यांवर जबाबदारी

गेल्या अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती, अखेर आता प्रतीक्षा संपली असून, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

मोठी बातमी! अखेर रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची नावं जाहीर, या नेत्यांवर जबाबदारी
रायगड, नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 17, 2026 | 1:56 PM

मोठी बातमी समोर येत आहे, रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू होती, अखेर यामध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री झाले असून, नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आदिती तटकरे या उत्सुक होत्या, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले हे उत्सुक होते. त्यामुळे अद्यापपर्यंत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाला नव्हता. परंतु आता भरत गोगावले यांनी बाजी मारली असून, रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टला भरत गोगावले यांनीच ध्वजारोहण केलं होतं.

त्यावेळी बोलताना त्यांनी आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असे संकेत दिले होते, आणि आता भरत गोगावले यांचा हा दावा खरा ठरला आहे, रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. दरम्यान भरत गोगावले हे सध्या दिल्लीमध्ये असून, दिल्लीतील मीना बाजार इथे पर्यटन विभागाच्या कार्यक्रमाला  भरत गोगावले यांनी हजेरी लावली आहे, ते आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा देखील तिढा सुटला आहे, नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी देखील रस्सीखेच सुरू होती, मात्र इथे गिरीश महाजन यांनी बाजी मारली आहे, नाशिकचे नवे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, या कुंभमेळ्याची संपूर्ण जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावर आहे. त्यांची कुंभ मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यानंतर आता त्यांची नाशिकचे पालकमंत्री म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आहे. आज रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहेत.

पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच  

दरम्यान रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला होता, परंतु आता भरत गोगावले यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ पडली आहे, तर दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us