मी स्वत: राणेंच्या संपर्कात, हाहाहा : छगन भुजबळ

| Updated on: Jan 13, 2020 | 5:52 PM

भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे 35 आमदार नाराज असून, ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.

मी स्वत: राणेंच्या संपर्कात, हाहाहा : छगन भुजबळ
Follow us on

नाशिक : भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे 35 आमदार नाराज असून, ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal on Narayan Rane) यांनी मिश्किल उत्तर दिलं. हसत हसत भुजबळ म्हणाले, मी स्वत:ही त्यांच्या संपर्कात आहे. (Chhagan Bhujbal on Narayan Rane)

नारायण राणे यांनी शनिवारी ठाण्यातील मालवणी महोत्सवाला हजेरी लावली होती. त्यावेळी राणे यांनी राजकीय भाष्य करणार नाही म्हणत, महाविकास आघाडीवर टीकास्त्रच सोडलं होतं. इतकंच नाही तर भाजपला कोणाची फिकीर करण्याची गरज नाही. 54 पैकी 35 त्यांच्याकडेच नाराज आहेत, असा दावा यावेळी राणेंनी केला होता.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“नारायण राणे यांनी 35 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे, त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असं भुजबळांना विचारण्यात आलं. त्यावर भुजबळ म्हणाले, “ठिकाय, मी आनंदी आहे. मी स्वत: सुद्धा त्यांच्या संपर्कात आहे. (हशा). मग आता काय करणार. एकमेकांशी बोलतो, सगळं संपर्कात आहेत”

नारायण राणे काय म्हणाले होते?

“भाजप कोणाकडे गेले नव्हते, शिवसेना स्वतः आली होती. भाजप केंद्रात आहे, महाराष्ट्रातदेखील मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याची गरज नाही. 54 पैकी 35 त्यांच्याकडेच नाराज आहेत.  या सरकारला कायमची सत्ता दिली नाही, आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ” असं नारायण राणे म्हणाले.

माजी मंत्री अरविंद सावंतांचं टीकास्त्र

दरम्यान, नारायण राणे यांच्या या दाव्यानंतर शिवसेना खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं. “मला वाटतं दिवास्वप्न पाहायला काय जातं? मी अनेकदा सांगितले कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. मला वाटतं तिच्या असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं. 1999 मध्ये किती संपर्कात होते आणि काय झालं तो इतिहास लक्षात ठेवावा”, असं अरविंद सावंत म्हणाले.