‘मग नक्कीच हा वाघ सर्कशीतला असावा’, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा शिवसेनेला पुन्हा टोला

| Updated on: Jun 28, 2021 | 5:47 PM

राणे यांनी ट्वीट करुन वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर भाष्य करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नारायण राणे हे शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याचं या ट्वीटवरुन पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

मग नक्कीच हा वाघ सर्कशीतला असावा, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा शिवसेनेला पुन्हा टोला
narayan rane uddhav thackeray
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात झालेल्या ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. व्यासपीठावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं सांगितलं. त्यावर वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावरुनच आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. (Narayan Rane criticizes Shiv Sena over Vijay Vadettiwar’s statement)

सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. राणे यांनी ट्वीट करुन वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर भाष्य करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नारायण राणे हे शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याचं या ट्वीटवरुन पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

ओबीसी चिंतन बैठकीत वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असं म्हटलं. यावर व्यासपीठावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं सांगितलं. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

कोकणातील कोरोना स्थितीवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना स्थितीवरुन राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. ‘सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ दिली. त्याच्या बदल्यात शिवसेनेनं कोरोना काळात सिंधुदुर्गात 901 तर रत्नागिरीमध्ये 1 हजार 561 मृत्यू दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मा. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?’, असा सवाल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांना केला होता.

संबंधित बातम्या : 

संजय राऊत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तीन दिवसातील दुसरी भेट! पडद्यामागे काय शिजतंय?

वडेट्टीवार म्हणाले, OBC असल्याने महसूल खातं मिळालं नाही, थोरात म्हणतात, वय बघता थोडी वाट पाहा!

Narayan Rane criticizes ShivSena over Vijay Vadettiwar’s statement