वडेट्टीवार म्हणाले, OBC असल्याने महसूल खातं मिळालं नाही, थोरात म्हणतात, वय बघता थोडी वाट पाहा!

बाळासाहेब थोरात म्हणाले, "काँग्रेस जातीयवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. विजय वड्डेटीवार यांना काही तरी वेगळं बोलायचं असेल. काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना संधी काँग्रेसने दिली होती"

वडेट्टीवार म्हणाले, OBC असल्याने महसूल खातं मिळालं नाही, थोरात म्हणतात, वय बघता थोडी वाट पाहा!
Vijay Wadettiwar_Balasaheb Thorat
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 1:29 PM

मुंबई : मी ओबीसी असल्यानेच मला महसूल ऐवजी हे खातं मिळालं या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांच्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षातील नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार यांचं वय पाहिलं तर पुढे त्यांना मोठी संधी मिळेल, थोडी वाट पाहावी लागेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. (Maharashtra Minister Vijay Wadettiwar said, I have not received the revenue Ministry because of I am from OBC, now congress Balasaheb Thorat said wait for now)

बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेस जातीयवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. विजय वड्डेटीवार यांना काही तरी वेगळं बोलायचं असेल. काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना संधी काँग्रेसने दिली. वड्डेटीवार यांचं वय पाहिलं तर त्यांना मोठी संधी पुढच्या काळात मिळेल,थोडी वाट पाहावी लागेल.

वाघ आणि वड्डेटीवार जुना संबंध

वाघ आणि वड्डेटीवार जुना संबंध आहे. शिवसेनेने नाराज होण्याची गरज नाही. ताडोबा अभयारण्य त्यांच्याच म्हणजे वडेट्टीवारांच्या भागात आहे. वाघ आणि आमची जवळीक चांगली आहे, चांगले संबंध आहेत, अडचण नाही. आघाडी भक्कम आहे, पाच वर्षे काम करणार, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले होते?  

ओबीसी आरक्षणासाठी विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या मंथन बैठकीचं आयोजन लोणावळ्यात करण्यात आलं होतं. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, “मी विरोधी पक्षनेता होतो. ओबीसींचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना”.

मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले होते.

VIDEO : बाळासाहेब थोरातांचा वडेट्टीवारांना सल्ला

संबंधित बातम्या  

“मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण ओबीसी असल्यानं हे खातं भेटले”, विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप  

मी गोपीनाथ मुंडेंचा शिष्य, पंकजांना वडेट्टीवार म्हणतात, आपण गुरुबंधू, वाचा ओबीसी परिषदेत काय घडतंय?  

झुकायला अन् वाकायला तयार, जेव्हा वडेट्टीवार ओबीसींच्या काळजाला हात घालतात, वाचा 15 मोठे मुद्दे

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.