Sindhudurg : नारायण राणे भाजपाचे की …., केंद्रीय मंत्री असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच होतोय सवाल उपस्थित

| Updated on: Sep 15, 2022 | 2:44 PM

राणे यांच्या प्रभादेवी परिसरातील हस्तक्षेपानंतर राणेंच्या भूमिकेबद्दलच शिवसेने उपनेते गौरीशंकर खोत यांनी सवाल उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीने राणे यांनी तत्परता दाखवली आहे, त्यानुसार ते भाजपाचे आहेत की शिंदे गटाचे असा सवाल सर्वसामान्यांचा पडला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

Sindhudurg : नारायण राणे भाजपाचे की ...., केंद्रीय मंत्री असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच होतोय सवाल उपस्थित
नारायण राणे
Image Credit source: Twitter
Follow us on

सिंधुदुर्ग :  (Mumbai) मुंबईतील प्रभादेवी चौकात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत राडा झाला होता. त्यावरून आरोप-प्रत्यारोप हे अद्यापही सुरुच आहे. दरम्यान, (Narayan Rane) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदे गटाचे आ. सदा सरवणकर यांची देखील भेट घेतली होती. एवढेच नाही तर मातोश्रीवरून सुत्रे हलवली गेल्यानेच दादर परिसरात राडा झाल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. शिवाय अशा काड्या करुन उपयोग नाही उद्या तुम्हालाही मुंबईत फिरायचे आहे असा अप्रत्यक्ष टोलाच त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख यांना लगावला होता. त्यावरुन मुंबईतील राजकारण तापले असतानाच राणे यांना मात्र, त्याच्याच जिल्ह्यातून आव्हान दिले जात आहे. (Shivsena Party) शिवसैनिकांना फिरणे कठीण होईल असे म्हणणाऱ्या राणेंनी आणि त्यांच्या मुलांनी बॉडीगार्ड नसताना फिरुन दाखवावे असे अव्हान शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांनी दिले आहे. त्यामुळे गणपती विसर्जण होऊन आता चार दिवस उलटले असले तरी त्या प्रभादेवी परिसरात झालेल्या राड्याचे पडसाद आणखी उमटतच आहेत.

नेमके काय होते प्रकरण ?

गणपती विसर्जण मिरवणूकीत येथील प्रभादेवी परिसरात शिंदे आणि शिवसेनेचे पदाधिकारी समोरासमोर आल्यानंतर घोषणाबाजी सुरु झाल्या होत्या. त्यावरुन तणावही निर्माण झाला तर दुसऱ्या दिवशी आ. सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यांच्यावरील या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या भेटीला गेले होते. त्याच दरम्यान, सरवणकर यांच्यावरील आरोप फेटाळत त्यांनी आगामी निवडणूक काळात मुंबईत फिरायचे आहे. असे आव्हानच ठाकरेंना दिले होते. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप हे सुरु आहेत.

राणे भाजपाचे की शिंदे गटाचे..!

राणे यांच्या प्रभादेवी परिसरातील हस्तक्षेपानंतर राणेंच्या भूमिकेबद्दलच शिवसेने उपनेते गौरीशंकर खोत यांनी सवाल उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीने राणे यांनी तत्परता दाखवली आहे, त्यानुसार ते भाजपाचे आहेत की शिंदे गटाचे असा सवाल सर्वसामान्यांचा पडला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. प्रभादेवी हे प्रकरण मुंबईत झाले असले तरी त्याचे पडसाद आता सिंधुदुर्गात पाहवयास मिळत आहेत.

मंत्र्यांना राज्याची तर केंद्रीय मंत्र्यांना जिल्ह्याची जबाबदारी

प्रभादेवी परिसराच झालेल्या प्रकरानंतर राणे यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते. पण राणेंच्या या आरोपांना आता सिंधुदुर्गातूनच आव्हान देण्यात आले आहे. राज्यातील मंत्र्यांना देखील राज्याचा कारभार पाहवयास मिळतो पण नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असताना त्यांच्याकडे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा कारभार सोपावल्याची टीका खोत यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवरच त्यांनी सवाल उपस्थित केला आहे.

पक्षात आपली ओळख काय?

शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी राणेंवर केवळ टीकाच केली नाहीतर भाजप पक्षात आपले स्थान काय याचीही आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप पक्ष त्यांना किती महत्व देत आहे, यावरुनही खोत यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे गणेश विसर्जण झाले असले तरी आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत.