नाशिक पश्चिम : भाजपच्या उमेदवाराविरोधात चार जणांची बंडखोरी

| Updated on: Oct 05, 2019 | 8:52 PM

या उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास मतांचं विभाजन अटळ आहे, ज्याचा थेट फटका भाजपच्या अधिकृत उमेदवाराला बसणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तर महाराष्ट्रातील बंडखोरांची समजूत काढत आहेत.

नाशिक पश्चिम : भाजपच्या उमेदवाराविरोधात चार जणांची बंडखोरी
Follow us on

नाशिक : बंडखोरीमुळे शिवसेना आणि भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. नाशिक पश्चिम (Nashik West Seema Hirey) मतदारसंघात तब्बल चार बंडोबा भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात (Nashik West Seema Hirey) उभे ठाकले आहेत. या उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास मतांचं विभाजन अटळ आहे, ज्याचा थेट फटका भाजपच्या अधिकृत उमेदवाराला बसणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तर महाराष्ट्रातील बंडखोरांची समजूत काढत आहेत.

भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पश्चिम मतदारसंघाचं तिकीट मिळणार हे कळताच, शिवसेनेने यावर दावा ठोकला. हा मतदारसंघ शिवसेनाच लढेल म्हणून चंग बांधला. मात्र भाजपाची रणनीती काही साधी नाही. शिवसेनेचा रोष पाहताच सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासाठी आलेल्या सीमा हिरे यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक नव्हते. मात्र मतदार आपल्याच पारड्यात मतं टाकतील, असा विश्वास सीमा हिरे यांनी व्यक्त केलाय.

शिवसेनेकडून इच्छुक असलेले सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, मामा ठाकरे आणि दिलीप दातीर यांनी मतदारसंघात आपलंच वर्चस्व आहे, त्यामुळे निवडणूक लढणारच अशी आक्रमक भूमिका घेतली. तर एकीकडे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या अपूर्व हिरे यांच्या ऐवजी डॉ. डी. एल. कराड यांना उमेदवारी मिळाली. मात्र अपूर्व हिरे यांनी एबी फॉर्म लावून आपला अर्ज दाखल केलाय. त्यामुळे सर्वच पश्चिम मतदारसंघात लढण्यासाठी इच्छुक आहेत.

सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, मामा ठाकरे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र हे बंडोबा माघार घेतात की लढतात हा प्रश्न आहे. मात्र विजय आपलाच आहे आहे, त्यामुळे मित्र पक्ष आणि युतीत असलेल्या शिवसेनेने आता स्वपक्षीयाला आव्हान दिल्याने सीमा हिरेंसमोरचा पेच नक्कीच वाढलाय.

शिवसेनेच्या या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचार करायलाही सुरुवात केली. तर शिवसेनेच्या दिलीप दातीर यांनी बंडखोरी करत मनसेच्या तिकिटावर लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचा उमेदवार आपल्याकडे येतोय हे पाहून मनसेने तात्काळ दिलीप दातीर यांना गळाला लावत पश्चिम मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केलाय.