रायगडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर तटकरेंना दोन जोरदार धक्के

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारंसघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन जोरदार धक्के बसले आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश देसाई हे दोघेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये सुनील तटकरे …

रायगडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर तटकरेंना दोन जोरदार धक्के

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारंसघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन जोरदार धक्के बसले आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश देसाई हे दोघेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये सुनील तटकरे यांना शिवसेनेने कोंडीत पकडले आहे.

माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले हे राजकारणात फारसे सक्रीय नसले, तरी बॅ. ए. आर. अंतुले यांना मानणारा मोठा वर्ग रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे अंतुले कुटुंबाची राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे नविद अंतुले हे शिवसेनेत गेल्यास सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं.

दुसरीकडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, प्रकाश देसाई आता स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश देसाई यांचीही राजकीय ताकद प्रभावी आहे. त्यामुळे प्रकाश देसाई हे राष्ट्रवादीतून निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडल्यास तटकरेंना फटका बसू शकतो.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनंत गीते हे रायगडमधून लोकसभेचे उमेदवार असतील, हे जाहीर झालं नसलं तरी निश्चित आहे. मात्र, गेल्यावेळी अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले सुनील तटकरे हे यावेळी गीतेंना मोठं आव्हान निर्माण करतील, हेही निश्चित. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील प्रभावी नेते आपल्यात घेऊन, अनंत गीतेंनी सुनील तटकरेंना कोंडीत पकडण्याची तयारी केल्याचे दिसून येते आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *