नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री राहणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झालं? वाचा एका क्लिकवर

| Updated on: Mar 17, 2022 | 8:51 PM

मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजप राजीनाम्यासाठी आक्रमक आहे तर राष्ट्रवादीच्या गोठातही यावरून बैठक सत्र पार पडलंय. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर ओकवरील बैठक संपली आहे.

नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री राहणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झालं? वाचा एका क्लिकवर
नवाब मलिकांबाबत मोठी अपडेट
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजप राजीनाम्यासाठी आक्रमक आहे तर राष्ट्रवादीच्या गोठातही यावरून बैठक सत्र पार पडलंय. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर ओकवरील बैठक संपली आहे. ही बैठक शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत घेण्यात आली. यात नवाब मलिकांच्या राजीनामा घेवू नये अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार राखी जाधव यांच्याकडे देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. तर आगामी महापालिका , जिल्हापरिषदा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी वेगळी आखणी करण्याच्या तयारीत आहे. ईडीने (Ed) मलिक यांना अटक केल्यापासून भाजपने आक्रमक पवित्रा घेत मलिकांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरलीय. त्यावरून अधिवेशनातही बराच गदारोळ झाला आहे.

पालकमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्यांकडे?

राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या पालकमंत्र्यांच्या बाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली. नवाब मलिक सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांना जमिनीच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवत अटक केली आहे. नवाब मलिक यांनी दाऊदसारख्या दहशतवाद्याला पैसा पाठवल्याचा आरोप सतत भाजपकडून होत आहे. निलेश राणे यांनी तर थेट शरद पवार यांच्याकडेच बोट दाखवण्यात आलंय. भाजप चारी बाजुने नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी दबाव बनवत आहे. त्यामुळे मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा दुसरा मंत्री जेलमध्ये

काही महिन्यातच राष्ट्रवादीचा दुसरा मंत्री जेलमध्ये गेल्याने भाजपकडून सतत वेगवेगळे आरोप होत आहेत. तर भाजप ही कारवाई सुडाच्या भावनेतून करत असल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे. तसेच नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे त्यांचे नाव दाऊदशी जोडले जात असल्याचा आरोपही शरद पवारांनी केलाय. तसेच मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी ठोस भूमिका राष्ट्रवादी घेतना दिसून आली. मात्र आता मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून मात्र अद्याप याबाबत कुठलीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे बऱ्यात गोष्टी अजून गुलदसत्यात आहेत.

अर्थसंकल्पातून सर्वांना न्याय देण्याची भूमिका, विरोधकांना टीका करु द्या, Shambhuraj Desai यांचं टीकास्त्र

Anil Parab IT Raid : अनिल परबांच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाच्या धाडीत मोठं घबाड मिळाल्याचा भाजप नेत्यांचा दावा

Pravin Darekar : भाजप नेत्यांवर कारवाईसाठी Sanjay Pandey यांना आणलंय, प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप