Anil Parab IT Raid : अनिल परबांच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाच्या धाडीत मोठं घबाड मिळाल्याचा भाजप नेत्यांचा दावा

Anil Parab IT Raid : अनिल परबांच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाच्या धाडीत मोठं घबाड मिळाल्याचा भाजप नेत्यांचा दावा
अनिल परब, परिवहन मंत्री
Image Credit source: TV9

भाजप आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. इतकंच नाही तर अतुल भातखळकर यांनी या धाडीचा संबंध पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याशी असल्याचा दावा केलाय. दरम्यान, आयकर विभागाने दिलेल्या प्रेस नोटमध्ये एकप्रकारे अनिल परब यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं पाहायला मिळत आहे.

सागर जोशी

|

Mar 17, 2022 | 8:40 PM

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडणची वाढल्याचं पाहायला मिळतंय. आयकर विभागानं 8 मार्च रोजी टाकलेल्या धाडीत मोठं घबाड मिळाल्याची माहिती आयकर विभागानं (Income Tax Department) प्रेस नोटद्वारे दिलीय. त्यावरुन आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. इतकंच नाही तर अतुल भातखळकर यांनी या धाडीचा संबंध पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याशी असल्याचा दावा केलाय. दरम्यान, आयकर विभागाने दिलेल्या प्रेस नोटमध्ये एकप्रकारे अनिल परब यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं पाहायला मिळत आहे.

आयकर विभागाच्या प्रेस नोटमध्ये काय?

आयकर विभागाने 8 मार्च रोजी मुंबईसह एकूण 26 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या धाडी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचं आता समोर येतंय. आयकर विभागाने दिलेल्या प्रेस नोटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात 26 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यात केबल ऑपरेटर, सरकारी अधिकारी आणि काही व्यावसायिकांचा समावेश होता. चौकशीवेळी असं दिसून आलं की महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेत्याकडून 2017 मध्ये दापोलीतील एक भूखंड एक कोटी रुपयांत खरेदी करण्यात आला होता. मात्र, त्याची नोंदणी 2019 मध्ये करण्यात आली. त्यानंतर ही जमीन 1 कोटी 10 लाखाला एका अशा व्यक्तीला विकरण्यात आली ज्याच्या विरोधात 2020 मध्ये कारवाई करण्यात आली. मधल्या काळात या जमिनीवर 2017 थे 2020 या काळात रिसॉर्ट बांधणात आलं. त्या राजकारण्याच्या नावावर जमिनीची नोंदणी होईपर्यंत रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण झालं होतं. पुढे 2020 मध्ये त्या राजकारण्याने त्या केबल ऑपरेटरला मालमत्ता विकली. तोपर्यंत रिसॉर्ट जवळपास तयार झालं होतं. यावरुन रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित बाबी नोंदणी अधिकाऱ्यांना कळवण्यात आली नव्हती. 2019 आणि 2020 मध्ये जमिनीच्या नोंदणीसाठी फक्त मुद्रांक शुल्क भरण्यात आलं. तसंच चौकशीवेळी मिळालेल्या पुराव्यांवरुन रिसॉर्टचे बांधकाम 2017 मध्येच सुरु झालं होतं. या बांधकामावर 6 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता. तसंच या बांधकामाचा खर्चाचा हिशेबही ठेवलेला नसल्याचं आयकर विभागानं सांगितलंय.

भातखळकरांचा परबांवर निशाणा

दरम्यान, ‘पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या राजकारण्याशी घट्ट संबंध असलेल्या सरकारी अधिकाऱ्याकडून बक्कळ रोकड, जमिनी आणि मालमत्तांची माहिती आयकर खात्याच्या हाती आली आहे? कोण ते ओळखा पाहू? आयकर विभागाने 8 मार्च रोजी मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीतील 26 ठिकाणी टाकलेल्या धाडींचा तपशील बाहेर आलाय. परबांच्या रिसॉर्टचे बांधकाम करताना फक्त 6 कोटींची रोकड वापरण्यात आली आहे’, असं ट्वीट भातखळकर यांनी केलंय.

ईडीनेही कारवाई करावी, सोमय्यांची मागणी

किरीट सोमय्या यांनीही अनिल परब यांच्यावर निशाणा साधलाय. ‘आयकर विभागाच्या धाडींचे परिणाम: अनिल परब, सदानंद कदम, बजरंग खारमाटे हे कोट्यावधींची रोकड, अपारदर्शक व्यावाकार आणि money laundering मध्ये सहभागी असल्याचे आढळले. या प्रकरणी ईडीने कारवाई करावी अशी विनंती सोमय्या यांनी केलीय. तसंच भारत सरकारनेही फौजदारी खटला दाखल केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

10 मुद्द्यांमधून नेमकं प्रकरण समजून घ्या!

  1. दापोलीतील 2017 साली जमीन खरेदी व्यवहार झाला.
  2. तब्बल 1 कोटी रुपयांचा हा व्यवहार होता.
  3. एक कोटी रुपयांमध्ये जमीन खरेदी करण्यात आली होती.
  4. दोन वर्षांनंतर या जमिनीची नोंदणी करण्यात आली.
  5. 2020 साली या जमिनीची दुसऱ्या व्यक्तीनं खरेदी केली.
  6. सदानंद कदम नावाच्या अनिल परबांच्या निकटवर्तीयाकडून ही खरेदी करण्यात आली. सदानंद कदम हे पेशानं केबल ऑपरेटर म्हणून ओळखले जातात.
  7. 2020 साली सदानंद कदम यांनी 1 कोटी 10 लाक रुपये मोजून जमिनीची खरेदी केली.
  8. या जमिनीत त्यानंतर रिसॉर्ट बांधण्यात आला. त्यासाठी तब्बल 6 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
  9. रिसॉर्ट बांधताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं.
  10. हा सगळा व्यवहार करताना मूल्यांकन कमी दाखवून स्टॅम्प ड्युटीही कमी करण्यात आली.

इतर बातम्या :

पुण्यात भाजपकडून ‘देशद्रोही दाऊद सरकार’ची होळी! Chandrakant Patil यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Pravin Darekar : भाजप नेत्यांवर कारवाईसाठी Sanjay Pandey यांना आणलंय, प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें