AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी अमित शहांना वाचवलं; गुजरातमधील गोध्रा दंगलीबाबत शिवसेनाचा मोठा दावा

सामनातील रोखठोक हे सदर संजय राऊत लिहायचे. पण सध्या संजय राऊत हे पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहेत. अद्यापही त्यांना जामीन मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या गैरहजेरीतही ‘रोकठोक’सदर सुरुच आहे. ‘कडकनाथ मुंबईकर’या नावाने आता रोखठोक सदर प्रसिद्ध केले जात आहे.

शरद पवारांनी अमित शहांना वाचवलं; गुजरातमधील गोध्रा दंगलीबाबत शिवसेनाचा मोठा दावा
| Updated on: Sep 11, 2022 | 9:25 PM
Share

मुंबई : बिल्किस बानो (Bilkis Bano) यांच्यामुळे गोध्राकांड पुन्हा चर्चेत आले आहे. त्यातच आता शिवसेनेनेदेखील गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीचा(Godhra riots) मुद्दा उकरुन काढला आहे. या दंगलीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(NCP chief Sharad Pawar ) यांनी भाजप नेते अमित शहा( BJP leader Amit Shah) यांना वाचवल्याचा मोठा दावा शिवसेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमान पत्रातील साप्ताहिक कॉलम ‘रोखठोक’मध्ये शिवसेनेने गोध्रा दंगली बाबत विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यात हा दावा करण्यात आला आहे.

‘कडकनाथ मुंबईकर’या नावाने रोखठोक सदर

सामनातील रोखठोक हे सदर संजय राऊत लिहायचे. पण सध्या संजय राऊत हे पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहेत. अद्यापही त्यांना जामीन मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या गैरहजेरीतही ‘रोकठोक’सदर सुरुच आहे. ‘कडकनाथ मुंबईकर’या नावाने आता रोखठोक सदर प्रसिद्ध केले जात आहे.

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर रोखठोक निशाणा

या विशेष सदरात अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेनेने रोखठोक निशाणा साधला आहे. मुंबई दौऱ्यात शिवसेनेवर टीकेची झोड उठवत अमित शहा यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. रोखठोक मधून अमित शहांवर टीका

अमितभाई, तुम्ही बोलत रहा! मऱ्हाठा नक्की उठेल! महाराष्ट्राविषयीचा द्वेष

अमितभाई, तुम्ही बोलत रहा! मऱ्हाठा नक्की उठेल! या शीर्षका अंतर्गत शिवसेनेने मोठा गौप्यस्फोट केला आहे. अमित शहा हे वारंवार शिवसेनेच्या बाबतीत ही अशी भाषा वापरतात. हा त्यांच्या मनातील महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे असे महाराष्ट्राविषयीचा द्वेष हा मुद्दा मांडताना म्हंटले आहे.

दरम्यान, शिवसेनेचा हा गौप्यस्फोट राष्ट्रवादीला पटलेला नाही. सामनामध्ये करण्यात आलेला दावा राष्ट्रवादीने फेटाळला आहे. या दाव्यात काहीही तथ्य नसून हा गौप्यस्फोट निराधार असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.