NCP On Chandrakant Patil | चाळीसगावात चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशअध्यक्षांची मनोवृत्ती व प्रवृत्ती दिसून आली

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 28, 2022 | 4:22 PM

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चाळीसगावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाले आहे. चंद्रकांत पाटलांन (Chandrakant patil) विरोधात कारवाईची मागणी आता राष्ट्रवादी पक्षाकडून जोर धरू लागले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून चंद्रकांत पाटलांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . भाजप नेते चंद्रकांत पाटीलयांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे. सुप्रिया सुळेंना  घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या, असे वक्तव्य केलेल्या चंद्रकांत पाटलाच्या विरोधात. राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलनं केली आहेत. तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे.चाळीसगावात चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी केली गेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निषेध केला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें