भाजपच्या आमदाराला क्वारंटाईन करा, राष्ट्रवादीची मागणी

| Updated on: May 06, 2020 | 12:09 PM

माळशिरसमधील भाजपचे आमदार राम सातपुते (NCP demands Quarantine of BJP MLA Ram Satpute) यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

भाजपच्या आमदाराला क्वारंटाईन करा, राष्ट्रवादीची मागणी
Follow us on

सोलापूर : माळशिरसमधील भाजपचे आमदार राम सातपुते (NCP demands Quarantine of BJP MLA Ram Satpute) यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीने तसं निवेदन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना दिलं आहे.

माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते हे माळशिरस तालुक्यामध्ये आलेले आहेत. मात्र ते बीड येथून आलेत की पुणे येथून हे स्पष्ट नाही. माळशिरसमध्ये बाहेरुन येण्यास किंवा बाहेर जाण्यास बंदी आहे. त्यामुळे आमदार राम सातपुते यांनी स्वत:हून क्वारंटाईन होणे गरजेचे आहे, असं राष्ट्रवादीने निवेदनात म्हटलं आहे. (NCP demands Quarantine of BJP MLA Ram Satpute)

माळशिरस तालुक्यात इतर तालुका किंवा जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. मात्र आमदार राम सातपुते यांना एक न्याय आणि सर्वसामान्य माणसाला दुसरा न्याय का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपस्थित केला आहे.

आमदार राम सातपुते हे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत,त्याबद्दल आमचे कोणतेच दुमत नाही. मात्र त्यांनी इतर जिल्ह्यातून प्रवास केला आहे, त्यामुळे त्यांनी स्वतः हून क्वारंटाईन होणे गरजेचे आहे, असं साठे यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत आमदार राम सातपुते?

  • राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे आमदार आहेत
  • 2019 च्याा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले
  • ऊसतोड मजुराचा मुलगा ते थेट आमदार असा त्यांचा थरारक प्रवास आहे.
  • अवघ्या 30 व्या वर्षी राम सातपुते हे आमदार झाले.
  • राम सातपुते यांनी पुण्यातून इंजिनिअरचे शिक्षण घेतले आहे
  • त्यानंतर ते संघाच्या आणि भाजपच्या संपर्कात आले
  • देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते यांना उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला
  • राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा पराभव केला.

(NCP demands Quarantine of BJP MLA Ram Satpute)