धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखाने धार्मिक कार्यक्रम टाळावे, राष्ट्रवादीच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला

| Updated on: Jul 21, 2020 | 4:19 PM

माजिद मेमन यांचे मत राष्ट्रवादीशी जोडले गेल्यानंतर त्यांनी पुन्हा ट्वीट करुन आपली भूमिका स्पष्ट केली.

धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखाने धार्मिक कार्यक्रम टाळावे, राष्ट्रवादीच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला
Follow us on

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. यावरुन राजकारण रंगण्याची चिन्हे आधीपासूनच दिसू लागली आहेत. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखाने धार्मिक कार्यक्रमांना जाणे टाळावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला आहे. (NCP ex MP Majeed Memon on CM Uddhav Thackeray planning to visit Ayodhya)

“उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रित आहेत. ते आपल्या वैयक्तिक क्षमतेत कोविड19 संबंधी निर्बंधांचे पालन करुन सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. मात्र धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखांनी विशिष्ट धार्मिक कार्यांना चालना देणे टाळावे” असे ट्वीट माजिद मेमन यांनी केले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

माजिद मेमन यांचे मत राष्ट्रवादीशी जोडले गेल्यानंतर त्यांनी पुन्हा ट्वीट करुन आपली भूमिका स्पष्ट केली. “माझे ट्वीट हे माझे वैयक्तिक मत आहे, मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नसल्यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मत असेलच असे नाही. उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याबाबत माझा सल्ला विचारला नाही आणि त्यांनी काय करावे, याबद्दल मी सांगण्याची स्थिती नाही” असे मेमन यांनी लिहिले.

राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आला आहे. अयोध्येचा कार्यक्रम शासकीय आहे. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी अयोध्येला नक्कीच जातील, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

शरद पवार जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा, शिवसेनेचं हिंदुत्व जगजाहीर : प्रताप सरनाईक

राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक, उद्धव ठाकरे नक्कीच अयोध्येत जातील : संजय राऊत

(NCP ex MP Majeed Memon on CM Uddhav Thackeray planning to visit Ayodhya)