पंकजा मुंडेंना होमग्राऊण्डवर धक्का, भाजपकडील माजलगाव नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात

| Updated on: Nov 09, 2020 | 2:52 PM

भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा करुन पंकजा मुंडेंनाच मोठा धक्का दिला.

पंकजा मुंडेंना होमग्राऊण्डवर धक्का, भाजपकडील माजलगाव नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात
Follow us on

बीड : भाजपच्या ताब्यात असलेली माजलगाव नगरपालिका (Majalgaon Nagarpalika) राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सपशेल माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या शेख मंजूर (Shaikh Manjoor) यांची बिनविरोध निवड झाली. (NCP gets Majalgaon Nagarpalika in Beed giving shock to BJP leader Pankaja Munde)

भाजप नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बरखास्त केल्यावर आज नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भाजपची सत्ता असलेली नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने कुतुहलाचा विषय ठरला आहे.

नेमकं काय झालं?

दसरा मेळाव्यात जोरदार भाषण करुन राजकारणात नव्याने मुसंडी मारण्याचा इशारा दिलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधूनच जबर धक्का मिळाला आहे. माजलगाव नगरपालिका भाजपच्या ताब्यात होती, मात्र नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला.

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी संधी साधत भाजप गटाचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या तंबूत आणले आणि आपला गड मजबूत केला.

भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला होता, मात्र भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा करुन पंकजा मुंडेंनाच मोठा धक्का दिला. मोहन जगताप आघाडीचे 4, राष्ट्रवादीचे 7, भाजपचा 1 आणि शिवसेनेचे 2 असे 14 संख्याबळ राष्ट्रवादीचे होते. सहाल चाऊस गटाच्या 4 नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने एकूण संख्याबळ 18 झाले. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांचा मार्ग मोकळा झाला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून मोठ्या मतांनी पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं बीड जिल्ह्याच्या राजकारणावरील लक्ष कमी झाल्याचं बोललं जात असे. दसरा मेळाव्यातील पंकजा यांचे भाषण पाहून बीड जिल्ह्यात पुन्हा जोमाने काम सुरु होईल असं वाटत असतानाच माजलगाव येथील नगरपालिका भाजप नेत्यांनीच राष्ट्रवादीच्या गोटात नेऊन दिल्याने पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का आहे. (NCP gets Majalgaon Nagarpalika in Beed giving shock to BJP leader Pankaja Munde)

संबंधित बातम्या :

भाजप नेत्यांकडून पंकजा नाराज नसल्याची सारवासारव, पण मुंडे समर्थकांची बैठकीला दांडीच

पंकजा मुंडेंना पुन्हा शिवसेनाप्रवेशाचे आमंत्रण, सेना खासदार उद्धव ठाकरेंना भेटणार

(NCP gets Majalgaon Nagarpalika in Beed giving shock to BJP leader Pankaja Munde)