
मुंबई : काही दिवसांआधी दिल्लीत राष्ट्रवादीचं अधिवेशन झालं होतं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू दिलं नव्हतं. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते हसले आणि म्हणाले… तेव्हा अजित पवार फ्रेश होण्यासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे वेळेअभावी त्यांना बोलता आलं नाही, असं जयंत पाटील म्हणाले.