
सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हरिदास पाटील यांची निवड करण्यात आली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली.

आज झालेल्या महासभेत महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी हरिदास पाटील यांच्या नावाची घोषणा केली. हरिदास पाटील यांनी यापूर्वीही नगरसेवक आणि स्थायीसभापती म्हणून काम केले आहे.

त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेता हरिदास पाटील यांची महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. या सभेत स्थायी समितीच्या 9 सदस्यांचीही निवड करण्यात आली.

निवडीनंतर नूतन नगरसेवक हरिदास पाटील आणि अन्य स्थायी सदस्यांचा महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.