VIDEO | जयंत पाटलांच्या मुलाचं राजकीय लाँचिंग? प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चात

| Updated on: Feb 09, 2021 | 3:59 PM

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील सांगलीत ट्रॅक्टर चालवत मोर्चात सहभागी झाला. (Jayant Patil Son Pratik Patil )

VIDEO | जयंत पाटलांच्या मुलाचं राजकीय लाँचिंग? प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चात
जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील सांगलीत आंदोलनात सहभागी
Follow us on

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे मोठे सुपुत्र प्रतीक पाटील (Pratik Jayant Patil) यांच्या नेतृत्वात सांगलीत मोर्चा काढण्यात आला. प्रतीक जयंत पाटील स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चात सहभागी झाले. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. (NCP Jayant Patil Son Pratik Patil Tractor March in Sangli)

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील ट्रॅक्टर चालवत मोर्चात सहभागी झाला. आष्ठा ते इस्लामपूर या मार्गावरुन हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.

“शेतकऱ्यांची बाजू ऐकणं केंद्राने टाळलं”

नवीन आलेल्या कृषी कायद्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकणं केंद्र सरकारने टाळलं आहे. शेतकरी आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. अनेक राज्यातील शेतकरी हे स्वतःची शेती सोडून दिल्लीत पोहोचले आहेत, याकडे प्रतीक पाटलांनी लक्ष वेधलं.

“केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात”

शेतकऱ्यांची हीच विनंती आहे की केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मनातील अडचणी ऐकून घ्याव्यात. पण केंद्र सरकार बरोबर संवाद साधायला दिल्लीत पोहोचला आहे, मात्र केंद्र सरकारने जमिनीत खिळे ठोकले, बॅरिकेट लावले, तारा बांधल्या आहेत. हे शेतकरी आपल्या भारतातील आहेत. शेतकरी आपलं म्हणणं मांडण्यासाठी सरकारच्या दारात गेले आहेत. केंद्र सरकारने अडचणी जाणून घ्याव्यात, असं प्रतीक पाटील म्हणाले.

“अभ्यास करा, मग कायदा लागू करा”

कोणतीही कंपनी काँट्रॅक्ट फार्मिंग करु शकते. करारामध्ये नियम टाकतील, कॉट्रॅक्ट फार्मिंग करताना फॉर्म सही करताना अनेक शेतकऱ्यांना वाचता येत नाही. त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आणतील. कायदा लागू करताना कायद्याची अंमलबजावणी करत असताना, अभ्यास करावा, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात, मग कायदा लागू करावा, असं वक्तव्य प्रतीक जयंत पाटील यांनी केलं.

संबंधित बातम्या :

मोदीजी हे वागणं बरं नव्हं, फडणवीसजी त्यांना योग्य सल्ला द्या: जयंत पाटील

(NCP Jayant Patil Son Pratik Patil Tractor March in Sangli)