मोदीजी हे वागणं बरं नव्हं, फडणवीसजी त्यांना योग्य सल्ला द्या: जयंत पाटील

राज्य सरकारने इंधनावरची कर कपात करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत. पण केंद्र सरकारने अजूनही राज्याच्या जीएसटीचा परतावा दिलेला नाही | Jayant Patil

मोदीजी हे वागणं बरं नव्हं, फडणवीसजी त्यांना योग्य सल्ला द्या: जयंत पाटील

वाशिम: आम्हाला सल्ले देण्यापेक्षा फडणवीसांनी ‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं’, असा सल्ला द्यावा अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. कारंजा विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीत जयंत पाटील बोलत होते. (Jayant Patil in NCP Parivar samvas yatra in Vashim)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारला सल्ला देताना म्हणतायत की, राज्य सरकारने इंधनावरची कर कपात करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत. पण केंद्र सरकारने अजूनही राज्याच्या जीएसटीचा परतावा दिलेला नाही, याची आठवणही जयंत पाटील यांनी फडणवीसांना करून दिली.

जयंत पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा आयोजित केला असून त्यांनी पहिल्या टप्प्याची सुरुवात विदर्भातून सुरु केली आहे. आतापर्यंत आठ जिल्हयामध्ये जयंत पाटील यांनी तालुका आणि विधानसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका, भेटीगाठी घेतल्या आहेत. या दौऱ्यानिमित्त ठिकठिकाणी इतर पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे हा दौरा पक्ष संघटनेसाठी फलदायी ठरत असल्याची प्रतिक्रिया विदर्भातील नेते व्यक्त करत आहेत.

‘पंतप्रधान मोदींनी हुकूमशाहीचा रोग झालाय’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत बसून हुकूमशाहीचा रोग लागला आहे. म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. पेट्रोलचे दर शंभरीच्या नजीक पोहोचले आहेत. आपल्या देशाच्या अर्थमंत्री प्रचंड विद्वान आहेत. पेट्रोलवर कर लावा आणि महसूल जमवा हेच केंद्र सरकारचे धोरण झाले आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

संबंधित बातम्या:

नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, फारसं लक्ष देऊ नका: शरद पवार

पवारांची फक्त तीन वाक्यं आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर

पीयूष गोयल हे शेती तज्ञ? ही तर माझ्या ज्ञानात भर, शरद पवारांचा टोमणा

(Jayant Patil in NCP Parivar samvas yatra in Vashim)

Published On - 6:17 pm, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI