बारामती नसेल, तर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढेन, सुप्रिया सुळेंनी सांगितलं गुपित

| Updated on: Dec 15, 2019 | 11:10 AM

वर्धा हा जिल्हा लहान वाटत असला तरी माझासाठी मोठा जिल्हा आहे, असं सुप्रिया सुळे भरभरुन बोलत होत्या.

बारामती नसेल, तर या मतदारसंघातून निवडणूक लढेन, सुप्रिया सुळेंनी सांगितलं गुपित
Follow us on

वर्धा : बारामतीनंतर कधी चॉईस द्यायची वेळ आली, तर सर्वात जास्त आवडणारा मतदारसंघ वर्धा (Supriya Sule Favorite Constituency)  असेल, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. वर्ध्यातील सावंगी येथे आयोजित राज्यस्तरीय मुख्यध्यापकांच्या अधिवेशनात त्या बोलत होत्या.

‘मी बोललेलं बारामतीकरांना आवडणार नाही. कारण माझी राजकारणात आणि समाजकारणात जी ओळख आहे ती बारामतीमुळे आहे. पण मला जर कधी चॉईस द्यायची वेळ आली आणि बारामतीमध्ये दुसरा खासदार उभा राहिला, तर मला सर्वात जास्त आवडणारा मतदारसंघ वर्धा असेल. हा जिल्हा लहान वाटत असला तरी माझासाठी मोठा जिल्हा आहे.’ असं सुप्रिया सुळे भरभरुन बोलत होत्या.

वर्धा जिल्ह्यातील पवनार आश्रमात संत विनोबा भावे काही काळ राहिले होते. अनेकांच्या जीवनाला नवीन आयाम देणाऱ्या संत विनोबा भावे यांच्या संस्कार आणि विचारांचा प्रभाव खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही झाला आहे. त्यांच्या विचारांची पडलेली भुरळ सुळेंनी जाहीर बोलून दाखवली.

मी माझ्या मुलांना नेहमी सांगत असते, मी ज्या दिवशी साठ वर्षांची होईन, तेव्हा महिन्यातले दहा दिवस मी वर्ध्यातील पवनार आश्रमात घालवणार, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पवनार आश्रमाच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे  बोलत होत्या.

विनोबाजींचे संस्कार माझ्यावर झाले आहेत, पुढेही होत राहतील. दरवेळेस मी जाते तेव्हा ही वास्तू आणि विचार नवीन वाटत असतात. हे विचार पुढल्या पिढीत पोहचवण्यात कमी पडतो आहोत. हा जिल्हा माझ्यासाठी इमोशनल जिल्हा आहे त्यामुळे मी ज्या दिवशी साठ वर्षांची होईल त्या दिवशी महिन्यातले दहा दिवस पवनार आश्रमात राहीन, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule Favorite Constituency) म्हणाल्या.