पक्ष सोडून गेले, तरी आदर कायम, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं सूचक उत्तर

| Updated on: Aug 27, 2019 | 8:53 AM

'कोणताही नेता पक्ष सोडून जात आहे, त्याचं दुःख वाटतंच. मात्र त्या नेत्यांनी माझ्या वडिलांना साथ दिली. त्याबद्दल पक्ष सोडून जाणाऱ्यांविषयी माझ्या मनात आदर कायम राहील, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या

पक्ष सोडून गेले, तरी आदर कायम, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं सूचक उत्तर
Follow us on

नाशिक : राष्ट्रवादीचे (NCP) दिग्गज नेते एकामागून एक पक्षाला रामराम ठोकत सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील होताना दिसत आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळही (Chhagan Bhujbal) शिवसेनेच्या (Shivsena) वाटेवर असल्याच्या चर्चा असताना, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आजपर्यंत वडिलांची साथ दिल्याबद्दल त्या प्रत्येकाविषयी आदर कायम राहील’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपल्या पक्षातून अनेक नेते बाहेर पडत आहेत. छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, यावरुन सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी नाशिकमध्ये प्रश्न विचारला. ‘कोणताही नेता पक्ष सोडून जात आहे, त्याचं दुःख वाटतंच. कारण आम्ही खासदार किंवा संघटना म्हणून काम करत नाही, तर एक कुटुंब म्हणून एकत्र असतो.’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

माझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज

‘मी लोकशाही विचारांची आहे. प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. दबावतंत्रावर माझा विश्वास नाही. मात्र एका गोष्टीची जाणीव मला आहे, की कधीतरी दोन मिनिटं, दोन तास, दोन वर्ष किंवा वीस वर्ष त्या नेत्यांनी माझ्या वडिलांना साथ दिली. त्याबद्दल पक्ष सोडून जाणाऱ्यांविषयी माझ्या मनात आदर, प्रेम आणि शुभेच्छा कायम राहतील. पक्ष सोडून जाणाऱ्यांना अप्रत्यक्ष शुभेच्छा’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मात्र त्यांच्या प्रतिक्रियेमुळे खरंच छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चा रंगली आहे.

भाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला

‘राष्ट्रवादीची जरी पडझड होत असली, तरी सगळीकडे आमची चर्चा असते. कितीही पक्षाचं नुकसान होऊ दे, चांगलं होऊ दे, मार्केटमध्ये आपलं नाणं अजूनही चालत आहे.’ अशी मिश्कील टिपण्णीही त्यांनी केली.

महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 76 सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाल्याने आता एकच खळबळ उडाली आहे. या बँक घोटाळ्यात शरद पवार यांचंही नाव येण्याची शक्यता दर्शवल्याने आता राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

योग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची ‘गुपचिळी’

‘माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. याबद्दल माझ्यासारख्या व्यक्तीने बोलणं जरी उचित नसलं, तरी शरद
पवारांना मात्र यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे’ असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. 55 वर्षांच्या राजकारणात त्यांचा कोणत्याही बँकेशी संबंध नाही. तरीही नाव घेतलं जातं, हे चुकीचं असल्याचं त्या म्हणाल्या.

देशात आणि राज्यात ईडी आणि सीबीआय चौकशीवरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सुप्रिया सुळे यांनी सरकारला ललकारलं होतं. माझ्याविरोधात ईडीची नोटीस (ED) काढून दाखवा, असं खुलं आवाहन सुप्रिया सुळेंनी सोलापुरात दिलं होतं.