AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली PM मोदींची भेट, नेमकं कारण काय?

शरद पवार गटाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. हा खासदार कोण आहे ते जाणून घेऊयात.

मोठी बातमी! शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली PM मोदींची भेट, नेमकं कारण काय?
Amar Kale and Modi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 22, 2025 | 4:15 PM
Share

गेल्या 2-3 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याचे समोर आले आहे. अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. आताही बरेच नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. अशातच आता शरद पवार गटाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. हा खासदार कोण आहे आणि त्याने पंतप्रधांनांची भेट का घेतली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमर काळेंनी घेतली मोदींची भेट

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातीस विकास कामांबाबत अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. अमर काळे यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

अमर काळेंची सोशल मीडिया पोस्ट

पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ट्वीट करत अमर काळे यांनी म्हटले की, ‘आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या व रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औघोगिकिकरण संस्था (MGIRI) च्या सर्वांगीण विकासाकरिता व संस्थेच्या विस्तारीकरणाकरिता लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली.’

अमर काळेंनी केला होता धक्कादायक दावा

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ‘विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. त्यांच्याकडून 160 जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली होती असं विधान केलं होतं. यावर बोलताना अमर काळे म्हणाले होते की, आमच्याकडे सुद्धा लोकसभा निवडणुकीआधी काही लोक आली होती. ते लोक की, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, इतकी-इतकी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. दुनेश्वर पेठे यांच्याकडेही प्रस्ताव आला होता, की दोन कोटी रुपये तुम्ही द्या किती मतांनी तुम्ही निवडून याल हे आम्ही सांगतो आणि तेवढ्याच मतांनी तुम्ही निवडून याल अशी ऑफर मिळाल्याचे काळेंनी म्हटलं होतं.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट