कधी नाना पटोलेंचा फोटो असलेल्या कार्यालयावर शरद पवार यांचा फोटो, राष्ट्रवादीच्या विभागीय ऑफिसचं उद्घाटन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नागपूरमधील बजाजनगर परिसरात कार्यालय होतं. त्याच ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय सुरु करण्यात आलं आहे.

कधी नाना पटोलेंचा फोटो असलेल्या कार्यालयावर शरद पवार यांचा फोटो, राष्ट्रवादीच्या विभागीय ऑफिसचं उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Nov 18, 2021 | 7:13 AM

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरपासून शरद पवार यांनी विदर्भ दौऱ्याची सुरुवात केलीय. शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. नागपूरमध्ये शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीचं विभागीय कार्यालय सुरु करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं कार्यालय असलेल्या जागेवर राष्ट्रवादीचं कार्यालय सुरु होतंय. कधी नाना पटोलेंचा फोटो असलेल्या कार्यालयावर लागला शरद पवार यांचा फोटो लागला आहे.

नाना पटोले यांचा फोटो असलेल्या कार्यालयावर शरद पवारांचा फोटो

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नागपूरमधील बजाजनगर परिसरात कार्यालय होतं. त्याच ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय सुरु करण्यात आलं आहे. कधी नाना पटोलेंचा फोटो असलेल्या कार्यालयावर शरद पवार यांचा फोटो लागला आहे. बजाजनगरात प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादीचं विभागीय कार्यालय सुरु केलं आहे. या कार्यालयाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसनं नागपूर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं जोरदार तयारी सुरु केली आहे.

नागपूर दौऱ्यात शरद पवारांना अनिल देशमुखांची आठवण

गेल्या अनेक वर्षांमध्ये आजचा असा पहिला दिवस आहे की नागपूरमध्ये आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख इथे नाहीत. हे आतापर्यंत घडलं नव्हतं. गेली अनेक वर्षे आपण एकत्रितपणे काम करतो. नागपूर जिल्हा, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या सगळ्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनाला आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे अनिल देशमुख यांनी सांभाळली, असं शरद पवार म्हणाले.

आताचे केंद्र सरकार हे एखाद्या राज्यात सत्ता मिळाली नाही तर सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार उभे करण्यात आपल्याला यश मिळाले. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा सहभाग आहे. राज्याला स्थिर कारभार देऊन प्रगतीच्या मार्गाकडे न्यायचा निर्णय आम्ही घेतला. पण काही लोकांना हे पटत नाही. काहींच्या हातून सत्ता गेल्याने त्यांच्यात एक अस्वस्थता निर्माण झाली. यातूनच दिल्लीच्या मदतीने इथलं राज्य कस घालवता येईल यासाठी अखंड प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. त्याची सुरुवात म्हणून सरकारमधील नेत्यांचा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांचा वापर करून एकप्रकारे छळवाद करण्याचे काम सुरू आहे, असं शरद पवार म्हणाले.

अनिल देशमुखांवर आरोप करणारे आयुक्त कुठे आहेत?

दोषारोप होताच अनिल देशमुख माझ्याकडे आले आणि दोष लागल्यामुळे मी सत्तेत बसणार नाही हा निर्णय घेतला आणि त्यांनी राजीनामा दिला. हे कशामुळे घडले तर एका माजी आयुक्तांमुळे घडले. आता हे आयुक्त आहेत कुठे?, असा सवाल शरद पवार यांनी केला. तुम्हाला तोंड दाखवायची ज्यांची तयारी नाही असे अधिकारी बाहेर आहेत आणि अनिल देशमुख आत आहेत. काही अस्वस्थ लोक याद्या तयार करून दिल्लीला पाठवतात आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेतृत्व केले. त्यांनी पक्ष बदलल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ईडीने चौकशीसाठी बोलावले, याची आठवण देखील शरद पवार यांनी करुन दिली.

इतर बातम्या:

Mehbooba Mufti House Arrest: मेहबुबा मुफ्ती अनिश्चित काळासाठी नजर कैदेत, केंद्र सरकारवरील टीका भोवली?

‘अनिल देशमुखांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली’, पवारांकडून कौतुक; भाजपवर जोरदार हल्लाबोल

NCP starts divisional office at Congress State President Nana Patole office inaugurated by Sharad Pawar

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें