जयंतरावांचं अचूक नियोजन, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

| Updated on: Feb 23, 2021 | 4:04 PM

जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलं, तर भाजपला दरवाजा दाखवला" असं महेश तपासे म्हणाले. (NCP BJP Sangli Mayor Election)

जयंतरावांचं अचूक नियोजन, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं
जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : सांगली मिरज कुपवाड महापालिकेत (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation) सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांची निवड झाली. त्यानंतर जयंतरावांच्या अचूक नियोजनाकडे लक्ष वेधत टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपला डिवचलं. (NCP taunts BJP over Sangli Mayor Election)

“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वात सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला. काँग्रेसने समर्थन दिलं. काँग्रेसचा उपमहापौर, तर स्थायी समिती अध्यक्ष झाला. महापालिकेत भाजप हद्दपार झाली. जयंत पाटील यांची कामगिरी उल्लेखनीय होती” असं तपासे म्हणाले.

“भाजपला दरवाजा दाखवला”

“विधानपरिषद निवडणुकांच्या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे जयंत पाटलांविषयी वेगवेगळी वक्तव्यं करत होते. मात्र पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी जिंकताच भाजप पश्चिम महाराष्ट्रात हद्दपार होणार, हे निश्चित झालं होतं. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयानंतर यावर शिक्कामोर्तब झालं. भाजपला भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाहीत, हे स्पष्ट झालं. जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलं, तर भाजपला दरवाजा दाखवला” असं महेश तपासे म्हणाले.

महापौरपदाच्या निवडणुकीत काय झालं?

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.

फोडाफोडीच्या शक्यतेमुळे उत्सुकता शिगेला

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली. (NCP taunts BJP over Sangli Mayor Election)

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण जागा – 78)