नवनिर्वाचित खासदारांनी मंत्रीपदाच्या लोभाचे बळी पडू नये : नरेंद्र मोदी

| Updated on: May 25, 2019 | 8:44 PM

नवी दिल्ली : देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर आज संध्याकाळी नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी संसदेत मोदींना संसदीय नेतेपदी एकमताने पाठिंबा दिला. यावेळी नरेंद्र मोदींनी “नवनिर्वाचित खासदारांनो, मंत्रीपदाच्या लोभाचे बळी पडू […]

नवनिर्वाचित खासदारांनी मंत्रीपदाच्या लोभाचे बळी पडू नये : नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर आज संध्याकाळी नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी संसदेत मोदींना संसदीय नेतेपदी एकमताने पाठिंबा दिला. यावेळी नरेंद्र मोदींनी “नवनिर्वाचित खासदारांनो, मंत्रीपदाच्या लोभाचे बळी पडू नका”, असे सांगितले. “विविध नेत्यांची मंत्रीपदी घोषणा होण्यापूर्वीच मीडियामध्ये त्यांची नावे मंत्री म्हणून झळकायला सुरुवात होईल. मात्र या सर्व अफवांपासून खासदारांनी दूर राहा, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.”

लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. संसदीय नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर मोदींनी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतले. भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि प्रकाश सिंह बादल यांनी मोदींना संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. हा प्रस्ताव संसदेतील सर्व खासदारांनी एकमताने मान्य केला.

सध्या देशात अनेक नरेंद्र मोदी जन्माला आले आहे. ज्यांनी मंत्रीमंडळाच्या स्थापनेपूर्वीच मंत्रीमंडळ बनवलं आहे. जे जिंकले आहेत, ते सर्व माझे आहेत. येत्या काही दिवसात माध्यमांत अनेक खोट्या गोष्टी झळकतील. विरोधी पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचंही तुमच्या कानावर येईल. मात्र याकडे दुर्लक्ष करा, माझा शपथविधी होईपर्यंत याकडे लक्ष देऊ नका, देशात एनडीएचे सरकार येणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचित खासदारांनी खोट्या अफवांपासून काही काळ दूर राहा असे माझे स्पष्ट मत आहे. असे नरेंद्र मोदी यांनी संसदेत नवनिर्वाचित खासदारांशी बोलताना सांगितले.

“जे नेतेपदासाठी जबाबदार आहे, त्यांचीच मंत्रीपदी नियुक्ती”

“वर्तमानपत्रावर छापलेल्या गोष्टीमुळे कोणतेही नेते मंत्री बनत नाही किंवा मंत्रीपदापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे प्रसिद्धीपासून खासदारांनी शक्य तेवढा वेळ दूर राहा,” असा सल्लाही नरेंद्र मोदींना खासदारांना दिला. तसेच जे नेते मंत्रीपदासाठी जबाबदार आहेत, त्यांनाच मंत्रीपद मिळणार आहे, असेही त्यांनी खासदारांना सांगितलं.

“अनेकदा खासदार म्हणून आपण अनेक वक्तव्य करतो. मात्र हीच वक्तव्य आपल्याला अडचणीत आणतात. त्यामुळे माध्यमांशी बोलताना थोडा सावध पावित्रा घेऊन संवाद साधा,” असेही मोदींनी खडसावले.

“व्हीव्हीआयपी कल्चरबाबत भारतीय जनतेला राग”

“एखादा खासदार विमाळतळावर गेल्यावर त्याचे चेकींग केल्यावर त्याला राग येतो. मात्र त्याचे चेकिंग का होऊ नये? नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात. त्याचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे. आपल्याला सर्वसामान्य माणसांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आपण त्यांच्याप्रमाणेच रहावे,” असे नरेंद्र मोदींनी खासदारांना सांगितले. तसेच “गेल्या पाच वर्षात मला भारतातील प्रत्येकाने एक गोष्ट आर्वजून शिकवली आणि ती म्हणजे, व्हीव्हीआयपी कल्चर…भारतातील सर्व जनतेला व्हीव्हीआयपी कल्चरबाबत प्रचंड राग आहे. भारतातील जनता त्याचा नेहमीच विरोध करते. त्यामुळे खासदारांनी व्हीव्हीआयपी कल्चरमध्ये राहणं टाळावं असा सल्लाही मोदींनी खासदारांना दिला”.

“खासदारांनी सर्वसामान्य जनतेप्रमाणे राहा”

“मंत्र्यांच्या गाडीवर लाल दिवा हटवण्यामागेही व्हीव्हीआयपी कल्चर हे सर्वात मोठे कारण होते. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे सर्वसामान्य लोकांप्रमाणे राहायचे, म्हणूनच त्यांच्यावर जनता प्रेम करायची. लोकसभेतील प्रत्येक खासदारांनी सर्वसामान्यांप्रमाणे राहावे. ही आपली सर्वात मोठी ताकद आहे”, असेही नरेंद्र मोदींनी निवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधताना सांगितले.