
महेश सावंत, प्रतिनिधी, मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईकांवर (Vaibhav Naik) गंभीर आरोप केले आहेत. 2009 ला हा माणूस काय होता आणि आज संपत्ती कशी काय वाढली? 2009 ते 2014 एक कोटी वरून सात कोटी संपत्ती झाली. 2014 ते 2019 सात कोटी वरून 22 ते 25 कोटी इतकी त्यांची संपत्ती झाली. वैभव नाईकांनी बेनामी मालमत्तेसह 150 कोटीहून अधिक संपत्ती जमा केली आहे, असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे स्वतः ला मर्द म्हणून संबोधतात. पण ते नपूसंक आहेत, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
2009 ते 20 19 या काळात वैभव नाईक यांच्या संपत्तीत 300 पटीने वाढ झाली आहे.
भास्कर जाधव यांच्या मांडीवर बसून रत्नागिरीच्या acb कार्यालयात जाऊन वैभव नाईकांनी माहिती द्यावी, असंही नितेश राणे म्हणालेत.
वैभव नाईकच काय छगन भुजबळांना देखील या चौकशीवरून तुरुंगात जावं लागलं होतं, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
वैभव नाईक तुम्हाला उद्धव ठाकरे बरे वाटतायेत, पण ते कसा वापर करून घेत आहेत हे आता कळणार नाही. हळूहळू स्पष्ट होतं. हवं तर रामदास कदम यांना विचारा.नारायण राणेंनी सेना सोडल्यावर रामदास कदमकडून काय बोलवून घेतलं ,आज ते काय बोलतात ते ऐका भास्कर जाधव,ऐका अरविंद सावंत…, असंही नितेश राणे म्हणालेत.
भास्कर जाधव तुम्ही फक्त राज्यममंत्रीच बनू शकला.मुलाला जिल्हापरिषदेचा अध्यक्ष बनवलं.याउलट राणेसाहेब मुख्यमंत्री झाले.आपल्या एका मुलाला खासदार तर एका मुलाला आमदार केलं, असं नितेश राणे म्हणत डिवचलं आहे.