फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

| Updated on: Nov 30, 2020 | 5:44 PM

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, असा दावा नितेश राणे यांनी केला. (Nitesh Rane Maratha Reservation)

फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा
Follow us on

 

सिंधुदुर्ग : “इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. ते सिंधुदुर्ग येथे “टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Nitesh Rane said that make Devendra Fadnavis CM of Maharashtra for Maratha Reservation)

“इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. हे मार्ग अवलंबल्याने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल. मात्र, मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही. खासदार उदयनराजे यांच्याप्रमाणे मीही सांगतो. लवकरात लवकर तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यात आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असं नितेश राणे म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही, असा आरोपही ठाकरे सरकारवर केला.

हे चोरांचं सरकार

यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी ठाकरे सरकारला मराठा समाजाला अरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप केला. तसे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं तर तीन महिन्यांत आम्ही मराठा समजाला टिकेल असं आरक्षण देऊ असा दावा केला. तसेच, हे चोरांचं सरकार आहे. महाविकास आघाडीला मराठा समाजाला त्रास द्यायचा आहे  असे म्हणत प्रामाणिकपणे आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट असल्याचंही ते म्हणाले.

उदयनराजे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस आपल्या वयाचे, त्यांनी आरक्षण टिकवलं

खासदार उदयनराजे भोसले यांनी 29 नोव्हेबंर रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार मराठा सामजाला आरक्षण देण्यासाठी गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जाती-जातीत तेढ निर्माण करु नका. राजकारण करुन तेवढीच वेळ मारुन न्यायची आणि फक्त राजकारण करायचं. शेवटी विचार करणं गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्याचं वयाचे आहेत. त्यांनी आरक्षण टिकवले. त्यासाठी पुढाकार घेतला. तरीही त्याला तुम्ही नाव ठेवता. सत्तांतर झालं. तुम्ही सत्तेत आला. पण तुम्ही ते का नेलं नाही. उलट तुम्ही वकीलाला गायब केलं आहे, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला. (BJP MP UdayanRaje Criticizes Maha Vikas Aaghadi)

एवढा मोठा प्रश्न आहे. तरी मराठा समाजाला किरकोळ करता. मराठा समाजाला विसरुन चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे. जसे इतर जातीतील लोक आहेत, तसेच मराठाही सुद्धा एक जात आहे. ती निर्णायक जात आहे, असेही उदयनराजे म्हणाले. (Nitesh Rane said that make Devendra Fadnavis CM of Maharashtra for Maratha Reservation)

संबंधित बातम्या :

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले

…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले

Maratha Reservation ! आज काहीच करू शकत नाही, अर्जदारांनी घटनापीठापुढे जावे: सर्वोच्च न्यायालय