AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले

राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. | Udayanraje Bhosale

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले
| Updated on: Nov 05, 2020 | 5:27 PM
Share

सातारा: मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केले आहे. तसेच आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला. वेळ आल्यावर मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मात्र, राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता. (BJP MP Udayanraje Bhosale on Maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळायला पाहिजे, या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचे सांगितले. तसेच योग्यवेळी मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन, असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच मराठा ठोक क्रांती मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी शरद पवार यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षांना एकत्र आणत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. त्याप्रमाणेच पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडवावा, अशी मागणी आबा पाटील यांनी केली होती. यासाठी लवकरच मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

शरद पवारांना मराठा आरक्षण सोडून इतर सर्व गोष्टींसाठी वेळ आहे: विनायक मेटे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मराठा आरक्षण सोडून इतर सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समलिंगी आणि तृतीयपंथीयांसाठी वेगळी शाखा तयार करण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टींसाठी शरद पवार यांना वेळ मिळतो. केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा आल्यावर त्यांच्याकडे वेळ नसतो, असे विनायक मेटे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवून एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा; नरेंद्र पाटील यांची मागणी

मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार

‘शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयक भूमिका स्पष्ट करावी; मग आम्ही पुढची दिशा ठरवू’

…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले

(BJP MP Udayanraje Bhosale on Maratha reservation)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...