VIDEO: भास्कर जाधव हे नरकासुर आणि सोंगाड्या; नितेश राणेंचा हल्लाबोल

| Updated on: Jul 06, 2021 | 11:22 AM

विधानसभेत काल भाजपच्या 12 आमदाराचं निलंबन करण्यात आलं. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. भास्कर जाधव हे नरकासुर असून सोंगाड्या आहेत. (nitesh rane)

VIDEO: भास्कर जाधव हे नरकासुर आणि सोंगाड्या; नितेश राणेंचा हल्लाबोल
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us on

मुंबई: विधानसभेत काल भाजपच्या 12 आमदाराचं निलंबन करण्यात आलं. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. भास्कर जाधव हे नरकासुर असून सोंगाड्या आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केला आहे. (nitesh rane slams bhaskar jadhav over 12 MLAs suspension)

12 आमदारांचं निलंबन झाल्यापासून भाजप नेते अधिकच आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी आज सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. आम्ही कोकणातले आहोत जाधवही कोकणातले आहेत. दशावतार असतात कोकणात. त्यात नरकासुर असतो. तो वेगवेगळे सोंग बदलतो. सोंगाड्याही असतो त्यात. जे जे भास्कर जाधवला ओळखतात त्याना माहीत आहे ते सोंगाड्या आहेत. ते नरकासुरासारखे आहेत. ते एकच सोंग कधीही ठेवत नाही. काल त्यांना कोणीही शिवी घातली नाही. कोणीही काहीही केलं नाही. पण तमाशातील सोंगड्या कसा असतो, नरकासुर कसा असतो. तसे हे भास्कर जाधव आहेत. आमच्या सारखे लोक त्यांना चांगलं ओळखून आहे. ते काय काय करतात ते आम्हाला माहीत आहे, असं सांगतानाच तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान एका सोंगाड्या माणसाने केला आहे. त्यांना काहीही झालं नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले का नाही? त्यांनी स्वत:चे कपडे का नाही फाडून घेतले. माझे बंधू निलेश राणे त्यांना चांगले ओळखतात, असं नितेश राणे म्हणाले.

मुख्यमंत्रीही सोंगाड्याच

भास्कर जाधव जसे सोंगाड्या आहेत. तसे मुख्यमंत्रीही सोंगाड्या आहेत. एक सोंगाड्या वर बसलेला होता. ते दुसरा खाली. मुख्यमंत्री सभागृहात काहीच बोलत नाही. कारण तेही सोंगाड्याच्या भूमिकेत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

आमचे आमदार लढले

भाजपचे 12 आमदार ओबीसींसाठी लढले. जनतेसाठी लढले, असं सांगतानाच आता आम्ही लोकांमध्ये जाऊन आमचे म्हणणे मांडू, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली. (nitesh rane slams bhaskar jadhav over 12 MLAs suspension)

संबंधित बातम्या:

Breaking : विधानसभेत तुफान राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, कोणकोणत्या आमदारांचा समावेश?

ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला, दुसरं काय? ‘केले तुका झाले माका’; राऊतांचा निशाणा

भाजपचे 12 आमदार निलंबित, नागपुरात पडसाद, बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पुतळे जाळले

(nitesh rane slams bhaskar jadhav over 12 MLAs suspension)