Nasik NMC Election 2022, Ward (1) : प्रभाग क्रमांक 1, गेल्या महापालिका निवडणुकीत चारही जागेवर भाजपाचा विजय; यंदा कोण बाजी मारणार?

| Updated on: Jul 19, 2022 | 10:13 AM

नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये मखमलाबाद गावठाण, रामवाडी परिसराचा समावेश होतो. गेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये चारही जागेवर भाजपाचे (BJP) उमेदवार विजयी झाले होते.

Nasik NMC Election 2022, Ward (1) : प्रभाग क्रमांक 1, गेल्या महापालिका निवडणुकीत चारही जागेवर भाजपाचा विजय; यंदा कोण बाजी मारणार?
Follow us on

नाशिक : राज्याच्या प्रमुख शहरातील महापालिकांच्या निवडणुकांचे (Municipal election) बिगूल वाजले आहे. यामध्ये नाशिक महापालिकेचा (NMC election) देखील समावेश आहे. निवडणुकीसाठी आरक्षण सोडत देखील जारी करण्यात आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत 2017 ला नाशिकमध्ये भाजपाने (BJP) एकहाती सत्ता मिळवली होती. तर त्या आधी सत्तेत असलेल्या मनसेला मोठा दणका बसला होता. गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे हाताच्या बोटावर मोजण्या इतके म्हणजे अवघे पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांवर राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे यंदा नाशिकमधून कोण बाजी मारणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एक बाबत बोलायचे झाल्यास गेल्या निवडणुकीत या प्रभागाच्या चारही जागेवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक एक हा भाजपाचा गड मानला जातो.

प्रभाग क्रमांक 1 मधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक एकमध्ये मखमलाबाद गावठाण, रामवाडी परिसराचा समावेश होतो. ज्यामध्ये रामवाडी परिसर, तळे नगर, कौशल्यानगर, प्रोफेसर कॉलनी, हनुमान वाडी, मोरे मळा, कोशिरे मळा, चौथरी मळा, गांधारवाडी, वडजाई माता नगर, लिलावती हॉस्पिटल, मखमलाबाद गावठाण, शांतीनगर, रामकृष्ण नगर, एरिगेशन कॉलनी या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये लोकसंख्या किती?

नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये एकूण लोकसंख्या 26566 इतकी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या 2851 एवढी आहे. तर अनुसूचित जमातीच्या मतदारांची एकूण संख्या 7012 इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

2017 मधील चित्र काय?

2017 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधील चारही वार्डात भाजपाचेच उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग क्रामांक एक वार्ड अ मधून भाजपाच्या पुनम धनगर या विजयी झाल्या होत्या. वार्ड ब मधून भाजपाच्या उमेदवार रंजना भानसी या विजयी झाल्या होत्या. वार्ड क मध्ये भाजपाचे गणेश गिते हे विजयी झाले होते. तर ड मध्ये भाजपाचेच अरुण पवार यांनी विजय मिळवला होता.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जारी करण्यात आली आहे. या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक एकमध्ये वार्ड अ मधील जागा ही अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहे. वार्ड ब सर्वसाधारण महिला, तर वार्ड क हा सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आहे.

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 अ

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 ब

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
मनसे
राष्ट्रवादी
इतर

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 क

पक्षउमेदवारविजयीय/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
मनसे
राष्ट्रवादी
इतर

2017 मधील पक्षीय बलाबल काय?

2017 च्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. नाशिकमध्ये भाजपाचे एकूण 66 नगरसेवक निवडून आले होते. सध्या नाशिक महापालिकेत भाजपाचे एकूण 65 नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे एकूण 35 नगरसेवक निवडूण आले होते, सध्या महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांचा एकूण आकडा 33 इतका आहे. राष्ट्रवादीचे 6, काँग्रेसचे 6 तर मनसेचे 5 नगरसेवक विजयी झाले होते.