AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nasik NMC election 2022 : भाजप वॉर्ड क्रमांक 21 वरची पकड कायम ठेवणार? शिवसेनेसमोर मोठं आव्हान

त्यातच मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चानी याला आणखी एक खत पाणी घातलं आहे. गेल्या वेळी नाशिकमध्ये वॉर्ड संख्या ही कमी होती. मात्र आता ती वाढली आहे. त्याचाही परिणाम हा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे.

Nasik NMC election 2022 : भाजप वॉर्ड क्रमांक 21 वरची पकड कायम ठेवणार? शिवसेनेसमोर मोठं आव्हान
गेल्या पंधरा वर्षांचा इतिहास पाहिला तर नाशिकची सत्ता ही सतत बदलत राहिलेली आहे.Image Credit source: tv9
| Updated on: Jul 25, 2022 | 2:56 PM
Share

नाशिक : राज्यात सध्या बड्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची (Muncipal Corporation Election) रणधुमाळी सुरू आहे. यात नाशिकला महानगरपालिकेच्या निवडणुकीनेही (NMC Election 2022) राजकीय वातावरण तापवलं आहे. मागच्या वेळी नाशिक मधून भाजपने (BJP) सहज बाजी मारली होती. त्याच्या आधी पाच वर्ष नाशिक हे मनसेचं राहिलं, त्याच्या आधीची पाच वर्ष ही नाशिकमध्ये शिवसेनेने गाजवलेली आहेत.  त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांचा इतिहास पाहिला तर नाशिकची सत्ता ही सतत बदलत राहिलेली आहे. यावेळी मात्र या ठिकाणी भाजपचं पारडं सध्या तरी जड दिसत आहे. त्यातच मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चानी याला आणखी एक खत पाणी घातलं आहे. गेल्या वेळी नाशिकमध्ये वॉर्ड संख्या ही कमी होती. मात्र आता ती वाढली आहे. त्याचाही परिणाम हा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे.

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

मागच्या वेळचे निकाल कसे होते?

नाशिकच्या वार्ड क्रमांक 21 चं चित्रही काहीसं बदलतं राहिलेलं आहे. मागच्या वेळी या ठिकाणाहून 21 मधून मेहरोलिया कोमल यांनी बाजी मारली होती. स्नेहल पार्क अपार्टमेंट जय भवानी रोड, नाशिक रोड इथून त्या येतात, तर यामध्ये 21 ब वरून रमेश ठोंबरे यांनी बाजी मारली होती. अशोक विहार, मंदिर रोड, मुक्तिधाम, नाशिक रोड, या ठिकाणाहून ते येतात तर या ठिकाणी तिसरा उमेदवार क मधून ज्योती खोले या निवडून आल्या होत्या, दत्तनिवास आर्टिलरी सेंटर रोड, खोले मळा, नाशिक रोड येथून त्या येतात. यामधून चौथ्या उमेदवाराने बाजी मारलेली ती सूर्यकांत लवटे यांनी, सावंत कॉम्प्लेक्स सोमवार पेठ, देवळाली गाव, नाशिक रोड या ठिकाणाहून ते येतात, असे चार उमेदवार यावॉर्ड मधून गेल्यावेळी निवडून आले होते. यावेळी असं चित्र दिसणार की चित्र पालटणार याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत.

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

अशा आहेत वॉर्डच्या सीमा

मुंबई आग्रारोडवरील पखाल रोड लगतच्या हॉटेल पंजाब पासुन पुर्वेकडे मुंबई आग्रा रस्त्याने व्दारका सर्कल ओलांडुन गोदावरी नदीवरील कन्नमवार पुलापर्यत तेथुन पुर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेवून उजव्या तिराने नदी लगतच्या गोदावरी नाशिक स.नं. 400 पावेतो, गोदावरी नदीलगतच्या नाशिक स.नं 400 पासुन गोदावरी- कपीला संगमा समोरील पश्चिमेकडील भाग घेवून गोदावरी नदीने नंदिनी संगमा पावेतो, गोदावरी नंदिनी संगमा पासुन नाशिक स.नं-373 पासुन पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेवून नंदिनी नदीच्या उजव्या बाजुने आंबेडकर वाडीच्या पश्चिम हद्दीने आंबेडकरवाडी, अशा वॉर्डच्या सीमा आहे. ज्या यावेळी वॉर्डरचना बदलल्याने बदलली असण्याची शक्यता आहे.

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.