कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील: राऊत

| Updated on: Jul 04, 2021 | 10:31 AM

भाजप नेते आशिष शेलार यांना भेटल्याच्या वृत्ताचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी इन्कार केला आहे. मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. (Sanjay Raut)

कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील: राऊत
संजय राऊत, नेते, शिवसेना
Follow us on

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांना भेटल्याच्या वृत्ताचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी इन्कार केला आहे. मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं. (no meeting with ashish shelar, it’s rumours, says Shiv Sena’s Sanjay Raut)

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार काल मुंबईत भेटल्याचं उघड झालं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचंही समोर आलं होतं. त्या वृत्ताचं आशिष शेलार यांनी इन्कार केला. आज राऊत यांनीही त्याचा इन्कार केला. अफवा पसरवल्या जातात. ज्यांना माझ्यापासून वेदना होतात, यातना होतात असे लोक अफवा पसरवत असतात. महाराष्ट्रात दोन वेगळ्या पक्षाचे नेते भेटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण काय?, असा सवाल करतानाच मी काल दिवसभर कामात होतो. कुणालाही भेटलो नाही. तरीही अफवा पसरवण्यात आल्या. अशा अफवा पसरवल्याने राजकारण हलत नाही, अस्थिरही होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाही. पण अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं राऊत म्हणाले.

अफवांमुळे मजबूत होऊ

मागे एकदा मी शेलारांना भेटलो होतो. त्यावेळी आम्ही उघडपणे कॉफी प्यायलो होतो, असं सांगतानाच जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ. मजबूतीने एकत्र येऊन. माझ्या लिखानाने कुणाला त्रास झाला असेल आणि त्यातून या अफवा आल्या असतील तर त्याचं मी स्वागत करतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

गोंधळ म्हणजे रणनीती नाही

उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधकांना महाराष्ट्राची चिंता असेल तर त्यांनी अधिवेशन चालू द्यावं. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आहे. त्यात गोंधळ घालू नये. चर्चा करावी. गोंधळ म्हणजे रणनीती नसते. गोंधळ करून अधिवेशन बंद पाडणं योग्य नाही. गोंधळात अधिवेशन वाहून जाऊ नये, असं सांगतानाच राज्यापुढे अनेक प्रश्न आहे. एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावर चर्चा होऊ शकते. कोरोनावर चर्चा होऊ शकते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले. (no meeting with ashish shelar, it’s rumours, says Shiv Sena’s Sanjay Raut)

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय?

संजय राऊत-आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, नाना पटोले म्हणाले…

“… तर भाजप विचार करेल” संजय राऊत-आशिष शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

(no meeting with ashish shelar, it’s rumours, says Shiv Sena’s Sanjay Raut)