Raj Thackeray : मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, 11 जुलैला हजर राहण्याचे आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय

Raj Thackeray : मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, 11 जुलैला हजर राहण्याचे आदेश
राज ठाकरे
Image Credit source: TV9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 09, 2022 | 11:16 AM

सांगली :  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात (Raj Thackeray) अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय. सांगलीच्या (sangali) शिराळ कोर्टानं (MNS) वॉरंट काढलंय. 11 जुलैला हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. वारंट निघूनही हजर न राहिल्यानं त्यांना बुधवारी अजामीन पात्र वारंट बजावण्यात आलं आहे. पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे. मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन अर्ज दिल्यानं त्यांचा अजामीनपात्र वारंट आदेश रद्द करण्यात आला आहे. मात्र, राज ठाकरे हे वारंट निघूनही हजर न राहिल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. म्हणून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश दिला आहे.

सांगलीच्या शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या पिठात नियमित फौजदारी खटला सुनावणी झाली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आरोपी क्रमांक 9 शिरीष पारकर हे आरोपी क्रमांक दहा म्हणून आहेत. यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी बुधवारी न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध केलेला अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला. यांना 15 हजार रुपयांच्या जामिनावर  आणि 700 रुपए खर्चाची दंडाची रक्कम भरून न्यायालयाने जामीन दिला आहे. राज ठाकरे हे वारंट निघूनही हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. ए. श्रीराम यांनी दिला आहे. दरम्यान ठाकरे यांच्या वकिलांनी इंस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात रीट दाखल केले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर  2008 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी शिराळा मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून तानाजी सावंत आणि इतर काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते. राज ठाकरे यांना 8 जून 2022 रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत काही कारणास्तव न्यायालयात हजर राहिले नाहीत. मात्र शिरीष पारकर न्यायालयात उपस्थित राहिले.