Corona Update : देशात आज तब्बल 40 टक्क्यांनी वाढले कोरोना रुग्ण! काय आहे नेमकी आजची आकडेवारी?

India Corona Tally : देशात आता 32,498 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Corona Update : देशात आज तब्बल 40 टक्क्यांनी वाढले कोरोना रुग्ण! काय आहे नेमकी आजची आकडेवारी?
कोरोना अपडेट
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 10:13 AM

नवी दिल्ली : देशात कोरोना (India Corona Update) रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली. गुरुवारी (9 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Central Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल सात हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण देशात आढलून आले आहेत. त्यामुळेचिंता व्यक्त केली जातेय. गेल्या 24 lतासांत 7,240 नवे रुग्ण आढळून आलेत. तर सध्याच्या घडीला देशातील सक्रिय कोरोना (Active corona cases) रुग्णसंख्या ही 34 हजाराच्या पार गेलीय. देशात आता 32,498 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे ही कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात तर नाही ना, अशी शंका घेतली जातेय. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्यात. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही राज्यांना खबरदारी घेण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.

गुरुवारची देशातील कोरोना आकडेवारी

  1. नवे रुग्ण – 7,240
  2. सक्रिय कोरोना रुग्ण – 32498
  3. बरे झाले – 3641
  4. मृत्यू- 8
  5. हे सुद्धा वाचा
  6. एकूण मृत्यू – 524723
  7. आतापर्यंत किती जणांचं लसीकरण – 194 कोटी 59 लाख 81 हजार 691

गेल्या काही दिवसांपासून देशातच नव्हे तर राज्यातही कोरोना रुग्णवाढीनं चिंत वाढवली आहे. राज्यातील सर्व लोकांना पुन्हा एकदा मास्कचं वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच पात्र असणाऱ्यांना बुस्टर डोस घेण्याचंही आवाहन केलं जातंय.

राज्यातही पुन्हा कोरोनाचं टेन्शन वाढलंय. बुधवारी राज्यात दोन हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. त्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळून आले होते. बुधवारी राज्यात  2701 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर मुंबईत 1765 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्येही कोरोनाचा धोका वाढतोय. पालघर, ठाण्यासह नागपूर, पुण्यातही रुग्णसंख्या वाढतेय.

..तर पुन्हा मास्कसक्ती?

दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर 2022 मध्ये लोकांच्या तोंडावरचे मास्क उतरवण्याची मुभा मिळालेली होती. पुन्हा सगळे मोकळा श्वास घेऊ लागले होते. पण आता वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं कळकळीचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. त्या पार्श्वभूमी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असं सांगितलं जातंय. मात्र रुग्णवाढ अशीच वाढत राहिली तर पुन्हा मास्क सक्तीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.